Sant Nivruttinath Maharaj temple esakal
नाशिक

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा महिनाभराचा आषाढी वारी सोहळा!

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari : त्र्यंबकेश्‍वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा महिन्याभराचा असेल. २ जूनला दुपारी दोनला संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरातून प्रस्थान केलेला हा पालखी सोहळा ३ आणि ४ जूनला नाशिकमध्ये असेल.

१४ जूनला नगरमध्ये मुक्काम केल्यावर १५ जूनला नगरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा होईल. २८ जूनला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्गावरील श्री निवृत्तीनाथ महाराज मठात पालखी मुक्कामी पोचेल. (Month long Ashadhi Wari ceremony of Saint Nivrittinath Maharaj Palkhi nashik news)

पंढरपूरमध्ये विठूरायाची आषाढी एकादशी २९ जूनला असून १ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरमध्ये असेल. त्यानंतर पालखी सोहळा त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान करेल. पालखीचे प्रस्थान झाल्यावर पहिल्या दिवशी सायंकाळी पाचला पालखी त्र्यंबकेश्‍वरमधील गुरूंच्या घरी महानिर्वाणी आखाडामधील गहिनीनाथ समाधी स्थानी मुक्कामी पोचणार आहे.

३ जूनला सायंकाळी चारला पालखी सातपूरमध्ये मुक्कामी येईल. ४ जूनला सकाळी नऊला नाशिक पंचायत समिती आवारात, दुपारी बाराला काझीपुरामधील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात पोचेल आणि तीनला पंचवटीतील आयुर्वेद रुग्णालयासमोरील गणेशवाडीतील नवीन भाजी मार्केटमध्ये मुक्कामी पालखी दाखल होईल.

पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी साडेसात ते आठ कीर्तन होईल. रात्री साडेआठ ते साडेनऊ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. दातली (ता. सिन्नर) येथे ७ जूनला दुपारी गोल, २० जूनला कर्जतच्या धांडेवस्तीवर उभे आणि परत २५ जूनला दगडी अकोले भागात गोल रिंगण होणार आहे. पालखी

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सोहळ्याचा कार्यक्रम असा :

दिनांक निघण्याची वेळ कोठून निघणार दुपारची ठिकाणे मुक्काम पोचण्याची वेळ

२ जून दुपारी २ त्र्यंबकेश्‍वर त्र्यंबकेश्‍वर त्र्यंबकेश्‍वर गुरूंच्या घरी सायंकाळी ५

३ जून सकाळी ७.३० महानिर्वाणी आखाडा वाढोली फाटा, महिरावणी, पिंपळगाव सातपूर सायंकाळी ४

४ जून सकाळी ७.३० सातपूर नाशिक गणेशवाडी दुपारी ३

५ जून सकाळी ११ नाशिक मुक्तिधाम नाशिक रोड पळसे सायंकाळी ६

६ जून सकाळी ७.३० पळसे शिंदे, पास्ते लोणारवाडी सायंकाळी ५

७ जून सकाळी ७.३० लोणारवाडी सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव, दातली (रिंगण) खंबाळे सायंकाळी ६

८ जून सकाळी ७.३० खंबाळे भोकणी, मऱ्हळ, निऱ्हळ पारेगाव सायंकाळी ६

९ जून सकाळी ७.३० पारेगाव काकडवाडी, तळेगाव, वडझरी, लव्हारे-कासारे गोगलगाव सायंकाळी ६

१० जून सकाळी ७.३० गोगलगाव लोणी, बाभळेश्‍वर राजुरी सायंकाळी ४

११ जून सकाळी ७.३० राजुरी ममदापूर, नांदूर, खंडाळा, श्रीरामपूर बेलापूर बुद्रूक सायंकाळी ६

१२ जून सकाळी ७.३० बेलापूर बुद्रूक बेलापूर खुर्द, देवळाली-प्रवरा राहुरी सायंकाळी ६

१३ जून सकाळी ७.३० राहुरी सडे, वांबोरी डोंगरगण

सायंकाळी ६

१४ जून सकाळी ७.३० डोंगरगण आढाववाडी, पिंपळगाव माळवी नगर सायंकाळी ६

१५ जून-------------------नगर येथे सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा--------------------------

१६ जून सकाळी ११ नगर तुकडओढा साकत सायंकाळी ६

१७ जून सकाळी ७.३० साकत वाटेफळ घोगरगाव सायंकाळी ६

१८ जून सकाळी ७.३० घोगरगाव मांदळी, कठीणदेव मिरजगाव सायंकाळी ४.३०

१९ जून सकाळी ७.३० चिंचोली मैरोबावाडी कर्जत सायंकाळी ४

२० जून सकाळी १० कर्जत धांडेवस्ती (उभे रिंगण) कोरेगाव दुपारी २

२१ जून सकाळी ७.३० कोरेगाव आंबी जळगाव, शेगूड रावगाव सायंकाळी ६

२२ जून सकाळी ७.३० रावगाव करमाळा जेऊर सायंकाळी ६

२३ जून सकाळी ७.३० जेऊर शेलगाव वांगी कंदर सायंकाळी ५

२४ जून सकाळी ७.३० कंदर वेणेगाव दगडी अकोले सायंकाळी ५

२५ जून सकाळी ७.३० दगडी अकोले परिते, गोल रिंगण करकंब सायंकाळी ६

२६ जून सकाळी ७.३० करकंब करकंब मार्गे पांढरीची वाडी सकाळी ११.३०

२७ जून सकाळी ७.३० पांढरीची वाडी गुरसाळे-धावा आरती चिंचोली सायंकाळी ७

२८ जून सकाळी १०.३० चिंचोली इसबावी, वाखरी सोहळा पंढरपूर दुपारी

२९ जून ते १ जुलै----------------------------------पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT