फोटो क्रमांक ः 33721
सागर बागूल.................विना दाढी
----
विनोद बागूल.................दाढी असलेला
---
उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकून
मोरदडच्या दोन भावांचा मृत्यू
---
बोरविहीर फाट्याजवळील घटना; गावात शोककळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ ः धुळे- चाळीसगाव रोडवरील बोरविहीर फाट्याजवळ सोमवारी (ता. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा अंधारामुळे अंदाज न आल्याने दुचाकी त्यावर जाऊन धडकली. या अपघातात सागर काशीनाथ बागूल आणि विनोद शामा बागूल (दोघे रा. मोरदड, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला.
सागर आणि विनोद सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धुळ्याहून मोरदड गावाकडे दुचाकीने जात होते. धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील टोलनाक्याच्या अलीकडे बोरविहीर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रॅक्टर उभा होता. परिसरात अंधार असल्याने उभ्या ट्रॅक्टरचा चालकाला अंदाज आला नाही आणि दुचाकी थेट ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की विनोद बागूल यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर बागूल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. मंगळवारी (ता. २७) सकाळी उपचारादरम्यान सागर यांचीही प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेत मोरदड येथील दोन तरुण चुलत भावांचा अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.