child labour.jpeg 
नाशिक

धक्कादायक आपबिती! पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला जुंपले बालकामगार...शिक्षणापासून अद्यापही वंचित 

नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोचावी, या हेतूने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक मुलास शिक्षणाचा हक्क मिळाला. मात्र, आजही राज्यात सुमारे 50 हजारांपेक्षाही अधिक बालकामगार पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला जुंपले आहेत. 

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही वंचित 

कौटुंबिक दारिद्रयामुळे मेट्रो शहरांच्या सिग्नल, चहा टपरी, किराणा दुकान, बिअर बार- हॉटेलमध्येही बालकामगार काम करीत आहेत. कामगार विभागाला ते कधीही दिसत नाही. केवळ कागदोपत्री छाप्याची कारवाई दाखविली जाते. बालकामगार दिनानिमित्त कामगार कार्यालयांकडून प्रबोधनात्मक उपक्रमाचा इव्हेंट केला जातो. प्रशासकीय उदासीनतेमुळेच धारदार असलेले बालकामागारांचे कायदे बोथट झाले आहेत. 

कृती समिती नावाला 
बालकामगारांसाठी अनेक सेवाभावी संस्था आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात बालहक्क कृती समिती आहे. समितीमार्फत बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या समित्या केवळ नावालाच असून, धोरणाअभावी कारवाई होत नाही. महिला बालकल्याण समितीतूनही फार काही विशेष झालेले नाही. 


कामगार उपायुक्तालयाचीच निष्क्रियता 
नाशिक कामगार उपायुक्त कार्यालयात बालकामगार विभागासाठी अवघे दोन कर्मचारी असून, त्यांनी पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागात छापे टाकणे, कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विभाग सोडा, नाशिक शहरात शेकडो बालकामगार उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही या विभागाकडून ठोस कारवाई झालेली नाही. यंदा तीन महिने लॉकडाउनमध्ये गेले. जानेवारी ते मार्चदरम्यान तक्रार आलेली नाही. त्यामुळे छापे टाकून कारवाई करणे दूरच राहिले. 2019 मध्ये विभागात 23 छापे टाकले. मात्र, एकही बालकामगार आढळला नाही. 2018 मध्ये विभागात 61 छापे टाकले. दोन बालकामगारांची सुटका झाली. दोघा मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 2017 मध्येही विभागात 49 छापे टाकून दोन बालकामगारांची सुटका व एका मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातून कारवाईची संबंधित यंत्रणेची निष्क्रियता स्पष्ट होते. 


राज्यात 50 हजारांपेक्षा अधिक बालकामगार 

बालकामगार प्रथेच्या उच्चाटनासाठी सामाजिक सहभागाची गरज आहे. यंदा लॉकडाउनमुळे जनजागृतीपर उपक्रम राबविता येणे शक्‍य नाही. समाजात झालेल्या जनजागृतीमुळे बालकामगारांचे प्रमाण घटले आहे. तरीही तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाते. -गुलाबराव दाभाडे, कामगार उपायुक्त  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT