Devendra Fadnavis criticize over maharashtra police corruption mahavikas aghadi politics esakal
नाशिक

Nashik News: सिंहस्थासाठी पूर्वीपेक्षा अधिक निधी मिळेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठक शांततेत झाली. त्यात केवळ जिल्हा समित्याकडून वाढीव मागणी नोंदविण्यात आली. तसेच सिंहस्थासाठी वाढीव निधी देण्याचे मोघम जाहीर करीत, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुठलेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.

आचारसंहितेनंतर लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यानंतर वाढीव निधीबाबत निर्णय होणार आहे. दरवेळी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय स्तरावर होणाऱ्या बैठक यंदा आचारसंहितेमुळे ऑनलाइन झाली.

नाशिकहून पालकमंत्री दादा भुसे, पालक सचिव आनंद लिमये, आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. हिरामण खोसकर, राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, तर नाशिक रोडहून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त रमेश काळे, नियोजन उपसंचालक प्रदीप पोतदार आदी सहभागी झाले होते.

सिंहस्थाचा विचार

बैठकीत पालकमंत्री भुसे यांनी नाशिकला आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत वाढीव मागणी केली. साधारण २२५ कोटी रुपये वाढीव मागणी केली.

जिल्ह्यातील आमदारांनी त्यांची वाढीव मागणी नोंदविली, त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. आचारसंहिता संपल्यानंतर राज्यस्तरीय नियोजन आढावा बैठकीत वाढीव मागणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले.

''आचारसंहितेमुळे कुठलाही धोरणात्मक निर्णय बैठकीत झाला नाही. मात्र वाढीव निधीची मागणी नोंदविण्यात आली. साधारण २२५ कोटीची वाढीव मागणी केली आहे. आचारसंहितेनंतर राज्यस्तरीय बैठकीत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यानंतर निर्णय अपेक्षित आहे.'' - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT