Speed Breaker esakal
नाशिक

Nashik News: शहरात नव्याने दोनशेहून अधिक गतिरोधक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रस्ता सुरक्षा समितीच्या अहवालानुसार शहरात दोनशेहून अधिक नवीन गतिरोधक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार समितीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये गर्दीच्या ठिकाणी, महामार्ग, शाळा, सरकारी कार्यालय या महत्त्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक बसण्याचा निर्णय घेतला. (More than two hundred new traffic jams in city Nashik News)

शहरामध्ये सद्यःस्थितीत जवळपास चारशे गतिरोधक आहे. मात्र यातील बहुतांश गतिरोधक नियमबाह्य आहे. त्यामुळे नागरिकांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. रस्ता सुरक्षा समितीकडे ३०९ नवीन गतिरोधकांचे प्रस्ताव आले होते.

त्या प्रस्तावांची छाननी रस्ते सुरक्षा समितीने गठित केलेल्या उपसमितीमार्फत करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे उपअभियंता, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे रवींद्र सोनाने यांच्या उपसमितीने ३०५ ठिकाणी भेटी दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गतिरोधकाची आवश्यकता आहे की नाही याची पाहणी करून अहवाल तयार केला. त्यानुसार दोनशेहून अधिक नवीन गतिरोधक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गतिरोधक तयार करण्याबरोबरच त्यावर उपाययोजना करण्यासाठी सात कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मो प्लास्टिक पेंटिंग पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर सूचनाफलक, नो- पार्किंग फलक या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

त्यासाठी सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT