नाशिक

धुळे दोघांचा मृत्यू

CD
फोटो क्रमांक : 35255...अनिल पाटील फोटो क्रमांक ः 35256...वना राऊळ ---- मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचा मृत्यू --- धुळे जिल्ह्यात घटना; दोन गावांत वाहनाच्या धडकेचे बळी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. धुळे तालुक्यातील गोंदूर आणि लामकानी परिसरात पहाटे सहा ते सातच्या दरम्यान पायी असताना, झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. स्वतःची कोणतीही चूक नसताना केवळ अंधार आणि भरधाव वाहनांमुळे घडलेल्या अपघातात त्या दोघांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पहिल्या घटनेत गोंदूर येथील बांधकाम व्यावसायिक अनिल पाटील शनिवारी (ता. १४) पहाटे पायी असताना, त्यांना अंधारात अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने बांधकाम क्षेत्रासह गोंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकाराचा मृत्यू लामकानी ः गोंदूर येथील घटना ताजी असतानाच लामकानी येथे अशीच घटना घडली. यात पत्रकार तथा देवेंद्र कृषी सेवा केंद्राचे कर्मचारी ठाणसिंग उपाख्य वना पहाडसिंग राऊळ (वय ४९) यांचा मालवाहू वाहनाच्या (एमएच १८ बीजी ८७१७) धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान लामकानी- निजामपूर रस्त्यावरील महावीर किराणा दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. या अनपेक्षित घटनेमुळे पीडित कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. वना राऊळ यांच्यावर सायंकाळी पाचला लामकानीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. दगेसिंग राऊळ, इंद्रसिंग राऊळ यांचे ते लहान बंधू होत. काळजी घेण्याची गरज सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे रस्त्यावर अंधार आणि धुके असते. या वेळेत महामार्गावर, अंतर्गत रस्त्यांवर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. वाहनचालकांना अंधारामुळे रस्त्याच्या कडेने चालणारे पादचारी लवकर दिसत नसल्याने हे जीवघेणे अपघात घडत आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळेचे भान राखून दाट अंधारात मॉर्निंग वॉकला जाणे टाळावे. पहाटे चालताना गडद रंगाचे कपडे टाळून पांढरे, पिवळे किंवा रिफ्लेक्टर (चमकणारे) पट्टे असलेले कपडे अथवा जॅकेट वापरावेत, जेणेकरून वाहनचालकांना लांबूनच अंदाज येईल, तसेच नेहमी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच येणारी वाहने दिसतील, अशा बाजूने आणि मुख्य डांबरी रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर चालावे. चालताना मोबाईल वापरणे आणि कानात इअरफोन्स घालणे टाळावे, जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनांचा आवाज स्पष्ट ऐकू येईल व संभाव्य अपघात टाळता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT