Nashik ZP esakal
नाशिक

Nashik News: बहुतांश अधिकाऱ्यांना देता आली नाही उत्तरे! ZPतर्फे 15 दिवसांनी पुन्हा होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी परीक्षा घेतली.

मात्र त्यात बहुतांश अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पंधरा दिवसांनी पुन्हा दोन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय परदेशी यांनी घेतला.

समारोपात परदेशी यांनी कामकाजावरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. (Most of officials could not give answers exam will be re conducted by ZP after 15 days Nashik News)

प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने मुख्यालयासह जिल्हाभरातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण नुकतेच झाले.

कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे यांनी पत्रलेखन, टिपणी लेखन, सर्वसाधारण आदेश काढताना घ्यावयाची दक्षता अनुकंपा प्रस्ताव व वैद्यकीय देयके काढण्याबाबत मार्गदर्शन केले.

कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन पवार यांनी विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्ताव तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत विवेचन केले.

बिंदूनामावली, सेवाज्येष्ठता, पदोन्नती यावर कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रशेखर पाटील तर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल गिते यांनी न्यायालयीन प्रकरणे कार्यपद्धतींवर प्रशिक्षण दिले. समारोपप्रसंगी परदेशी यांनी उपस्थितांची परीक्षा घेतली.

पब्लिक रेकॉर्ड अॅक्टबाबत विचारणा केली असता रणजित पगार यांच्याव्यतिरिक्त एकालाही समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. त्यानंतर या अॅक्टबाबत परदेशी यांनी सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अभिलेखा वर्गीकरण नियमाबाबतही विचारणा करण्यात आली. प्रकाश थेटे यांनी संबंधित अॅक्टबाबत माहिती दिली. अभिलेख कक्षात किती अधिकारी गेले, अशी विचारणा झाली असता एकही अधिकारी गेलेला नसल्याचे दिसले. न्यायप्रविष्ट प्रकरणावर परदेशी यांनी विवेचन केले.

काही लिपिक जुमानतच नाही...

प्रशिक्षणादरम्यान प्रामुख्याने पंचायत समितीस्तरावरील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी कामात येत असलेल्या अडचणी सांगितल्या.

प्रामुख्याने ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाबाबतची फाइल लिपिकांकडून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे जाते.

त्यामुळे संबंधित विषयांसंदर्भातील माहिती होत नसते. परंतु, प्रशासनाकडून विचारणा केली जात असल्याचे अनेकांनी सांगितले. कामकाज करताना विभागातील काही लिपिक जुमानत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT