आत्महत्या Google
नाशिक

मुलाचा खून करून मातेची आत्महत्या; आईवडील घरात असताना घडला प्रकार

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेसइनजवळ राहणाऱ्या शिखा सागर पाठक (३२, रा. साई सिद्धी अपार्टमेंट) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच खोलीत त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा रिधान देखील मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा चौथ्या मजल्यावर राहतात. बैठकीच्या खोलीत त्यांचे आई-वडील बसलेले होते. त्या दरम्यान त्या स्वतःच्या बेडरूममध्ये गेल्या आणि गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख आणि वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तातडीने तेथे जात संपूर्ण घराची कसून तपासणी केली. त्याच खोलीत त्यांचा मुलगाही मृतावस्थेत आढळून आल्याने मुलाचा खून करून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रथमदर्शनी त्यांनी आपल्या मुलाचा तोंडावर उशी दाबून खून केला असावा व मग स्वतः आत्महत्या केली असावी असे दिसून येत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृत्यूच्या वेळी त्यांचे आई-वडील घरातच उपस्थित होते. त्यांनी अद्याप काहीही तक्रार दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT