latest nashik news esakal
नाशिक

जन्मदात्रीनेच घोटला मनोरुग्ण मुलाचा गळा; ढेकू येथील घटना

मुलाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध आई जनाबाई हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : जन्मदात्या आईनेच आपल्या मनोरुग्ण मुलाच्या खुनाची सुपारी देऊन त्याची निर्घृण हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील ढेकू येथे घडली. जनार्दन पेंढारे (वय ४७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जनार्दन हा मनोरुग्णासारखा वागून नेहमी आई-वडिलांना मारहाण करीत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून वृद्ध आई जनाबाई हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. (Crime news)


नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे जनाबाई पेंढारे या वृद्धा पती अप्पा पेंढारे व मुलगा जनार्दन यांच्यासोबत राहतात. मनोरुग्ण असलेला जनार्दन हा वृद्ध आई- वडिलांना जबर मारहाण करीत असायचा. शिवाय त्याच्या विक्षिप्तपणाचा गावकऱ्यांनाही नेहमीच त्रास होत असे. या त्रासाला कंटाळून अखेर आईनेच जनार्दनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने गावातीलच समाधान दौलत भड याला जनार्दनला ठार मारण्यासाठी पंधरा हजार रुपयांची सुपारी दिली. जनार्दन घरात झोपलेला असताना समाधानने लोखंडी पहारीने त्याच्या डोक्यात वार करून ठार मारले. जनार्दनचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा मृतदेह प्लॅस्टिक गोणीमध्ये भरून परिसरातील साईनाथ राठोड यांच्या शेतातील विहिरीमध्ये फेकून दिला. मात्र, गोणी मृतदेहासह पाण्यावर तरंगून आल्याने शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात आली. (Latest marathi news)

पोलिस पाटील विजय चव्हाण यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोणीतील मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतदेह गावातील जनार्दन पेंढारे याचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता जन्मदात्या आईनेच मुलाची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली. या घटनेने पोलिसांना देखील आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT