नाशिक

पुलाचे काम दर्जात्मकच

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 34795 धुळे : साक्री रोडवरील मोतीनाला पुलावर नव्याने करण्यात आलेले काँक्रीटीकरण. - मोतीनाला पुलाचे काम दर्जात्मकच - बांधकाम विभाग : ‘ते’ पाणी झिरपल्याने स्लॅब कोसळला सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : शहरातील साक्री रोडवरील मोतीनाला पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी (ता. ८) पत्रकाव्दारे केला आहे. चार नोव्हेंबरला बांधकाम सुरू असताना पुलाचा स्लॅब ‘सेंटरिंग’ खचल्याने कोसळला होता. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेची पाइपलाइन फुटून पाणी झिरपल्याने हे ‘सेंटरिंग’ खचल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. - खचलेला स्लॅब पूर्णपणे काढून त्याचे बांधकाम नव्याने करण्यात आले असून, सात नोव्हेंबरला नव्या स्लॅबचे काँक्रीटीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यात २६ जानेवारीला या पुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. पुलाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीत असताना चार नोव्हेंबरला स्लॅबचे सेंटरिंग खचल्याने काँक्रीटचा भाग कोसळला होता. याप्रकरणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून चौकशीची मागणी करण्यात आली होती. - कुठलाही गैरहेतू नाही या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी सार्वजनिक खुलासा केला आहे. स्लॅबच्या ‘सेंटरिंग’च्या वरच्या बाजूला असलेली महापालिकेची पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटल्याने खाली पाणी झिरपले आणि ‘सेंटरिंग’ खचले. काँक्रीटीकरण सुरू असताना ‘सेंटरिंग’ हलत असल्याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या तत्काळ लक्षात आल्याने काम रोखण्यात आले. ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा इजा झाली नाही. ही घटना निव्वळ अपघाती असून, त्यात कोणताही गैरहेतू किंवा अनियमितता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. - नव्याने स्लॅबचे काम या घटनेची जबाबदारी स्वीकारत खचलेला स्लॅब पूर्णपणे काढून त्याची उभारणी नव्याने करण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम ‘संकल्पचित्र मंडळ, मुंबई’ यांच्या प्रमाणित आराखड्यानुसार (टाईप प्लॅन) सुरू असून, नियमानुसारच पोलादाचा (स्टील) वापर करण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्कता आणि काळजी घेतली जाईल, असेही विभागाने नमूद केले. हा पूल १८ मीटर रुंदीचा असून, या विस्तारीकरणामुळे साक्री रोडवरील वाहतूक कोंडी कायमची सुटण्यास मदत होणार असल्याचेही पत्रकात नमूद आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

Latest Marathi News Live Update: : "आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन ५ ते १० हजारांपर्यंत वाढवा"; अमरावतीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणांची आक्रमक मागणी

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

SCROLL FOR NEXT