Amol Deore esakal
नाशिक

Nashik Accident News: देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट परिसरात मोटारसायकल अन् ट्रॅक्टरचा अपघात; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट परीसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात शुक्रवार (ता.२३) रोजी झालेल्या भीषण अपघातात वाजगाव येथील अमोल विजय देवरे (वय २८) हा दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. (Motorcycle and tractor accident in Dhobighat area on Deola Malegaon road death of one Nashik News)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (ता.२३) रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वाजगाव (ता. देवळा ) येथील अमोल विजय देवरे व पराग मोरे हे दोन युवक मोटारसायकलने ( एमएच ४१ एव्ही४१०५ ) मालेगाव कडून देवळा येथे येत असतांना धोबीघाट परिसरात देवळयाकडून वेगाने जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला समोरून जोरात धडक दिली. त्यात अमोल देवरे गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त कळताच दहिवड व परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीकने दोघा जखमींना मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र डॉक्टरांनी अमोल देवरे याची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. पराग मोरे (वय २६) याचे वर पुढील उपचार सुरू आहेत. सदर ट्रॅक्टर हा मेशी येथील असल्याची माहीती मिळत आहे

शवविच्छेदनानंतर अमोलचा मृतदेह वाजगाव येथे आणण्यात आला. रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात अमोलवर वाजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोलच्या पश्चात आई वडिल, भाऊ, बहीण असा परीवार आहे. वसाकाचे निवृत्त कर्मचारी विजय बळीराम देवरे व ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी देवरे यांचे ते पुत्र होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT