23572
सिन्नर : चोरट्याकडून हस्तगत केलेल्या दुचाकी. समवेत पोलिस पथक.
शेतमजूर निघाला दुचाकी चोर
पाच दुचाकी जप्त; तीन गुन्ह्यांची उकल
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १८ : शेतमजुरी करणाऱ्या युवकास सिन्नर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनेत अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून तीन घटना उघडकीस आल्या आहेत. विकी महादेव पवार (२३, रा. फत्तापूर, ता. नेर, जि. यवतमाळ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांचा पास करताना पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना या चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मुसळगाव शिवारातील केला कंपनीजवळून त्यास ताब्यात घेण्यात आले. शोध पथकातील पोलिस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड यांनी ही कारवाई केली. विकी पवारची कसून चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरासह तालुक्यातील देवपूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील दुचाकी चोरीच्या घटना कबूल केल्या. चौकशीत अजूनही काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. शेतमजुरी करतानाच विकी पवार दुचाकी चोरी करत होता.
पोलिस अधीक्षक डाँ. डी. एस. स्वामी, अपर अधीक्षक विमला एस. उपअधीक्षक कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.