Karwande esakal
नाशिक

Nashik News : डोंगराची काळी मैना बाजारात दाखल; आदिवासी बांधवांना मिळणार रोजगार!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे इगतपुरीतील दुर्गम आणि कसारा घाटाच्या आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहेत.

यामुळे आदिवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. (Mountain black current karwand entered market Tribal comunity get employment Nashik News)

चैत्र महिन्यापासून या आंबट गोड करवंदांच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद घडेघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात.

या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात. मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करत असल्याची स्थिती आहे.

डोंगरची काळी मैना आरोग्यदायी असून दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. रानमेव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

करवंदाचे आरोग्यदायी लोणचे

आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वीच करवंदांचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदा पासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. करवंदांचे लोणचे आरोग्यदायी मानले जाते मधुमेह, रक्तदाब अपचन, हायपर ॲसिडिटी असणाऱ्यांना हे लाभदायक असते.

काही वर्षापूर्वी या भागातील महिला बचत गटांनी करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता. मात्र पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने उद्योग डबघाईस आला.

आदिवासी बेरोजगार तरुण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी सरकारने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आदिवासी बांधवांमधून होत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

झाडांचे प्रमाण घटते

वातावरणातील असमतोलपणा, डोंगरांना लागणारा वणवा व सोबतच होणारी जंगलतोड आणि जंगलाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे करवंदांची झाडे दिवसेंदिवस कमी होत आहेत. गेल्या २० वर्षाच्या तुलनेत करवंदांची झाडे मोठ्या संख्येने घटली आहेत.

आंबट -तुरट चवीचा हा रानमेवा चाखण्यासाठी करवंदांच्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात. पूर्वी वाट्यावर मिळणारा हा रानमेवा आता दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे.

"उन्हाळ्यात मिळणारी डोंगरची काळी मैना आरोग्यवर्धक आहे. आम्ही परंपरागत हा व्यवसाय करतो. दिवसेंदिवस करवंदांची झाडे कमी होत आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे."

- सुदाम धुपारे, रानमेवा विक्रेता

"जंगलात उगवणाऱ्या या गावरान मेव्याच्या शोधासाठी पहाटेपासून लगबग करावी लागते. नैसर्गिक स्वाद आणि आरोग्यासाठी पोषक असतात ग्राहकांना रानमेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असतो." - लहानूबाई आगिवले, चिंचलेखैरे, (ता. इगतपुरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT