File photo
नाशिक

उड्डाणपुलासंदर्भात खासदार संजय राऊत काय बोलणार?

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा

काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य व कामगारांना परवडणारा अल्पदरातील सिडकोचा गृहप्रकल्प झाला. त्यानंतर प्रथमच सिडकोच्या विकासात भर टाकणारा उड्डाणपूल बनू पाहत आहे.

सिडको (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून सिडकोतील उड्डाणपुलावरून (Flyover) राजकारण तापले असताना नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सिडकोवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर म्हणजे उड्डाणपुलाबाबत आता काय बोलतात, याकडे संपूर्ण सिडकोवासीय व नाशिककरांचे लक्ष लागले आहे. (MP Sanjay Raut will arrive in Nashik today regarding the flyover)

काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य व कामगारांना परवडणारा अल्पदरातील सिडकोचा गृहप्रकल्प झाला. त्यानंतर प्रथमच सिडकोच्या विकासात भर टाकणारा उड्डाणपूल बनू पाहत आहे. असे असताना महापौरांनी सदर उड्डाणपूल रद्द व्हावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. तर दुसरीकडे उड्डाणपूल रद्द झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे प्रतिआव्हान शिवसेना महानगरप्रमुख यांनी महापौरांना दिले आहे. दुसरीकडे उड्डाणपूल व्हावा, याकरिता सिडकोतील शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे हे राजकीय पक्ष प्रथमच ‘हम सब एक है’ चा नारा देताना दिसून येत आहे. असे असताना उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले शिवसेनेना नेते संजय राऊत आज रविवारी (ता. १३) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने आता ते सिडकोवासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनू पाहणाऱ्या उड्डाणपुलासंदर्भात काय भाष्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेसाठी ‘टर्निंग पॉइंट’

गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीपासून सिडकोमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून येत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीदेखील याच भागातून सर्वाधिक मते शिवसेना पक्षाच्या खासदारांना पडलेले आहे. त्यामुळे सिडको म्हणजे शिवसेनेचा जणू काही बालेकिल्लाच आहे, हे सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत सिडकोत होणारा उड्डाणपूल शिवसेनेसाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल एवढे मात्र नक्की! (MP Sanjay Raut will arrive in Nashik today regarding the flyover)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT