MPSC Exam esakal
नाशिक

MPSC Exam: ‘गट क’ मुख्य परीक्षेला 376 परीक्षार्थ्यांची दांडी! शहरातील 20 केंद्रांवर 7 हजार 154 परीक्षार्थ्यांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता. १७) महाराष्ट्र ‘गट क’ सेवा मुख्य परीक्षा २०२३ चे आयोजन केले होते. या परीक्षेला प्रविष्ट असलेल्‍या सात हजार ५३० परीक्षार्थ्यांपैकी ३७६ जणांनी दांडी मारली, तर सात हजार १५४ उमेदवार परीक्षेला सामोरे गेले.

सर्व २० केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्‍याचे जिल्‍हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (MPSC Exam 376 Candidates for Group C Main Exam Attendance of 7 thousand 154 examinees at 20 centers in city nashik)

एमपीएससी’तर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्‍या पूर्वपरीक्षेतून पात्रता मिळविलेल्‍या उमेदवारांची महाराष्ट्र ‘गट क’ सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन केले होते. रविवारी झालेल्‍या या परीक्षेनिमित्त केंद्राबाहेर बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता.

नाशिक शहर-जिल्ह्या‍सह विभागातून परीक्षार्थी या परीक्षेसाठी नाशिकला आले होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्‍या शाळांमध्ये केंद्र असल्‍याने परीक्षार्थींची गैरसोय झाली नाही. या परीक्षेसाठी नाशिक शहरात २० केंद्र होते.

दोन सत्रांत पार पडली परीक्षा

संबंधित परीक्षा सकाळ आणि दुपार, असे दोन सत्रांत पार पडली. सकाळच्‍या सत्रात सात हजार २६० परीक्षार्थी उपस्‍थित होते, तर २७० जणांनी दांडी मारली.

दुपारच्‍या सत्रात सात हजार १५४ परीक्षार्थी हे परीक्षेला सामोरे गेले व ३७६ उमेदवार गैरहजर होते. परीक्षेसाठी ७६६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्‍टाफ नियुक्‍त केला होता.

...या पदांसाठी होणार निवड

मुख्य परीक्षेतून आयोगातर्फे विविध संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक राज्‍य उत्‍पादनशुल्‍क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय या विविध शासकीय विभागांतील पदे परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार भरले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facebook, Insta बंदचा राग, आंदोलक घरांना लावतायत आग! ५ मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारी

Shreyas Iyer: 'KKR संघांच्या मिटिंगचा भाग असायचो, पण...', श्रेयसने केला मोठा खुलासा; पंजाबबद्दलही स्पष्ट बोलला

बापरे! काजल अग्रवालची पसरली अपघाती निधन? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली, अभिनेत्री सर्वांनाच सुनावलं

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

SCROLL FOR NEXT