MPSC Exam esakal
नाशिक

MPSC Skill Test Result : दोनदा कौशल्‍य चाचणी घेऊनही लागेना निकाल; आयोग सहनशीलतेची चाचणी घेत असल्‍याची टीका

सकाळ वृत्तसेवा

MPSC Skill Test Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गेल्‍या वर्षी घेतलेल्‍या परीक्षांतून पात्रताधारक उमेदवारांची तब्‍बल दोन वेळा कौशल्‍य चाचणी घेऊनही अंतिम निर्णयाची उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागते आहे. (MPSC Skill Test Result not declaring of qualified students nashik news)

गट-क संवर्गातील मंत्रालय क्‍लार्क आणि कर सहाय्यक या पदांसाठीच्‍या भरती प्रक्रियेत आयोग उमेदवारांच्‍या सहनशिलतेची चाचणी घेत असल्‍याची टीका केली जात आहे. संतप्त उमेदवारांकडून यापूर्वी आंदोलनदेखील छेडण्यात आले होते.

लिपिक टंकलेखकच्या एक हजार १६४ आणि कर सहाय्यक पदाच्‍या २८५ जागांसाठी २०२१ मध्ये आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्‍यानुसार गेल्‍यावर्षी ३ एप्रिलला पूर्व परीक्षा घेतांना परीक्षेतील पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑगस्‍ट महिन्‍यात पार पडली होती. या मुख्य परीक्षेचा निकाल ७ डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता.

यानंतर यावर्षी ७ एप्रिलला कौशल्‍य चाचणी घेण्यात आली. उमेदवारांनी थेट मुंबई गाठतांना ही चाचणी दिली होती. परंतु तांत्रिक अडचणींचे कारण देतांना आयोगाकडून ही चाचणी पुन्‍हा ३१ मेस घेण्यात आलेली आहे. या चाचणीदरम्‍यान पूर्वीपेक्षा जास्‍त त्रूटी असल्‍याचा दावा उमेदवारांकडून केला जातो आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्‍यामुळेच चाचणी होऊन २४ दिवस उलटूनही आयोगाकडून निकाल जाहीर केला जात नसल्‍याने संताप व्‍यक्‍त केला जातो आहे. २०२१ च्या परीक्षेपासून पहिल्यांदाच सुरू केलेल्या कौशल्य चाचणी पात्रता परीक्षेत उमेदवारांना आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊनदेखील नियुक्ता जाहीर होत नसल्‍याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्‍याची खंत उमेदवारांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. अशात सिसॅटप्रमाणे कौशल्‍य चाचणीचे मूल्‍यांकन ३३ टक्‍के करताना त्‍याआधारे तातडीने निकाल जाहीर करावा अन्‍यथा सर्व उमेदवारांना पात्र धरण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

दुसऱ्या चाचणीतही आक्षेप..

आयोगाने टंकलेखनाचा उतारा जाहिरातीत नमूद निकषांपेक्षा मोठा दिला. टायपिंग सर्टिफिकेट जीसीसी टीबीसीच्‍या अर्हतेपेक्षा हा उतारा खूप जास्त होता.

आयोगाने कीबोर्ड लेआउट, आयएसएम रेमिन्‍टन मराठी देण्याचे सांगितले असतांना प्रत्‍यक्ष चाचणीत रेमिंटन गेल हा हिंदी लेआउट दिल्‍याचा उमेदवारांचा दावा आहे.

चाचणीत ऑटो स्‍क्रोल बंद केल्‍यामुळे उमेदवारांना उतारा स्वतः स्‍क्रोल करावा लागला. यातून उमेदवारांचा गोंधळ उडाला. टायपिंग करताना शब्‍द हायलाईट झाले नाही, यामुळेदेखील संभ्रम निर्माण झाल्‍याचे उमेदवारांचे म्‍हणणे आहे. यासह अनेक हरकती उमेदवारांनी आयोगाकडे नोंदविल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT