नाशिक

एमपीएससीच्‍या विद्यार्थ्यांच्‍या आंदोलनाला खासदार वाजेंचा पाठिंबा

CD
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वाजेंचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना पत्र; मागण्यांवर संवेदनशीलतेने तातडीने तोडगा काढण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी सध्या न्यूयॉर्क येथे असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यावर तातडीने व संवेदनशीलतेने विचार करण्याची मागणी केली. एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करीत आहेत. अनेक वर्षे कठोर परिश्रम करून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे वाजे यांनी पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांमधील संभ्रम व अनिश्चितता दूर करण्यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. यापूर्वी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्यास तिच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. पुण्यातील आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा होती. मात्र, आमसभेनिमित्त न्यूयॉर्कमध्ये असल्याने ते शक्य झाले नाही, असे वाजे यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या स्वतंत्र पत्रात नमूद केले. कोट “एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक आणि मानसिक संघर्षातून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता, त्यांच्या भविष्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न म्हणून शासनाने संवेदनशीलतेने विचार करावा. विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने समाधानकारक तोडगा काढावा.” - राजाभाऊ वाजे, खासदार

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT