Procession of Kalpesh Chaure in a bullock cart esakal
नाशिक

MPSC Success Story: कळवणच्या कल्पेशने घातली सहाय्यक नगर रचनाकार पदाला गवसणी!

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचे आदिवासी तरुणांना आवाहन 

रवींद्र पगार

MPSC Success Story : तालुक्यातील मूळ करंभेळ व  हल्ली मुक्काम पिंपळनेर येथे राहण्यास असलेल्या कल्पेशधनलाल चौरे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत सहाय्यक नगर रचनाकार पदाला गवसणी घातली आहे. (MPSC Success Story Kalpesh of Kalvan achieved Assistant Town Planner post nashik news)

वडील नोकरी निमित्ताने पिंपळनेर ता साक्री जि धुळे येथे असल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण जि प शाळा व माध्यमिक शिक्षण कर्मवीर आ. मा. पाटील या विद्यालयात पिंपळनेर येथे झाले आहे. उच्चमाध्यमिक शिक्षण के टी  एच एम कॉलेज नाशिक तर बीई सिव्हिलचे शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्याची मूल्यनिर्धारण संचालनाच्या आस्थापनेत  सहाय्यक नगर रचनाकार , महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा या पदाकरिता निवड झाली आहे.

चि कल्पेश हा जयश्री धनलाल चौरे यांचा चिरंजीव असून. धोंडु शंकर चौरे व कारभारी  मन्साराम बागुल यांचा नातु आहे.

तालुक्यातील वरखेडा या गावी संजय व विजय बागुल सत्कार करून ग्रामस्थ योगेश बागुल, राजाराम बहिरम, राहुल बागुल, धनलाल बहिरम, दिनेश बागुल, रामदास जगताप, सुरेश पाडवी आदींनी पुढील पिढीसाठी प्रेरणा मिळण्यासाठी मोठया उत्साहाने डी जे वाजवून  पारंपारिक पध्दतीने बैलगाडी मध्ये मिरवणुक काढुन त्याचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

यावेळी पिंपळनेर येथील ग्रामविस्तार अधिकारी व्ही.डी. पाटिल, सरपंच आबा बागुल, वैभव सर,युवराज गांगुर्डे, सागर सोनवणे  .गजानन ठाकरे, पालवी सर,व  सुदाम पवार   यशपाल ठाकरे  जयवंत पवार, सिताराम ठाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

कल्पेश चौरे - सहाय्यक नगर रचनाकार - आदिवासी तरुणांनी पारंपरिक शेती व इतर शासकीय नोकऱ्या मिळविण्याच्या प्रयत्नात एकाच प्रकारच्या शिक्षणावर अवलंबून न राहता आधीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास यश नक्कीच मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करावी   

फोटो -   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT