MSEB officer found accepting bribe esakal
नाशिक

Bribe News : लाच स्वीकारताना वीज वितरण अधिकारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून १७ हजाराची लाच स्वीकारताना वीज वितरणच्या द्वारका उपविभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती ढानपे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्याच्यावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अशी माहिती विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी दिली.

एका इमारतीच्या साईटवर डीपी बसविणे आणि इमारतीत ४१ इलेक्ट्रिक मीटरची जोडणी देण्यात येणार होती. त्यासाठी स्वतंत्र डीपीची आवश्यकता होती. मीटर आणि डीपीसाठी संशयित संजय ढानपे याने २५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर १७ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदार शासकीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आत्माने, प्रवीण महाजन आणि नितीन कराड यांनी टाकळीरोड तिगरानिया येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. याठिकाणी संशयित ढानपे यास १७ हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

समाजास लागलेली भ्रष्टाचाराच्या किडीमुळे दिवसेंदिवस लाच घेण्याचे प्रकार वाढतच आहे. नागरिकांनी सतर्क राहून त्यांच्याकडे लाचेची मागणी करणाऱ्यांचा विरोध करून तक्रार दाखल करावी यासाठी अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने अन्य कुणी त्यांच्याकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी ०२५३, २५७८२३० क्रमांक किंवा टोल फ्रि क्रमांक १०६४ वर तक्रार करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT