Accidental Bus
Accidental Bus esakal
नाशिक

Nashik Fire Accident : धावत्या बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुखरूप

योगेश मोरे

नाशिक : काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या बसला अपघात व आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यातच बुधवारी (ता. ४) दुपारी पेठ आगारातून नाशिकच्या दिशेने निघालेल्या बसच्या इंजिनने फुलेनगर परिसरात अचानक पेट घेतला.

चालकाच्या सावधानतेमुळे बस तत्काळ उभी केली. स्थानिक नागरिकांनी वेळीच धावपळ करून बसच्या इंजिनला लागलेली आग घरातील पाण्याच्या साहाय्याने आटोक्यात आणली. या घटनेत सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बसच्या बाहेर उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. (msrtc bus Fire broke out near Peth Road left bank canal All passengers safe Nashik Fire Accident)

एसटी महामंडळाची बस (एमएच- १४- बीटी- ३३३८) बुधवारी दुपारी नाशिकच्या दिशेने निघाली. बस पंचवटीतील फुलेनगर पाटावर येताच चालकाच्या केबिनमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. या वेळी चालक गणेश खंदारे यांनी लागलीच बस पाटा लगत उभी केली. तर, वाहक शेवंता आवारे यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

बसला आग लागलेली असल्याचे फुलेनगर येथील स्थानिक नागरिकांना समजताच अविनाश कातारे, बापू सपकाळे, आनंद जाधव, पिंटू गायकवाड, दौलत सकट, मंगल जाधव, गोविंद जाधव, प्रवीण गांगुर्डे, कैलास पवार, विष्णू साळवे आदींनी आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली. नागरिकांनी घरातील पाणी बादलीतून आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

तर, काहींनी रस्त्याच्या कडेला असलेली वाळू व माती आगीवर टाकून काही वेळातच आग आटोक्यात आणली. यानंतर अग्निशमन दलाचे जवानांना घटनेची माहिती मिळताच ते एक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग विझलेली असली तरी, आग पुन्हा भडकू नये यासाठी त्यांनी थोडासा पाण्याचा फवारा मारला.

यानंतर एसटी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस वर्कशॉप येथे नेण्यात आली. बसच्या चालक केबिनमध्ये असलेल्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाले. याचवेळी डिझेल गळती व ऑइल गळती झाल्याने आगीने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण करण्याआधीच चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पटमहिला किरकोळ जखमी

बसमध्ये ३६ प्रवासी प्रवास करीत होते. यातही महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. बसला आग लागल्याची घटना घडतात प्रवाशांनी बसमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ सुरू केली. या धावपळीत एक महिला बसमधून खाली पडल्याने किरकोळ जखमी झाली. तर उर्वरित सर्व प्रवासी, चालक व वाहक सुखरूप असल्याने, सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

शूटिंग करण्यापेक्षा बचावकार्य

केबिनमधून मोठा धूर बाहेर पडत असल्याचे, फुलेनगर येथील स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करीत मदतीला अन्य नागरिकांना बोलावले. तत्काळ क्षणाचा विलंब न लावता नागरिकांनी घरातील पाणी आणून लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी येथील नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यापेक्षा बचावकार्य करण्यास प्राधान्य दिल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT