MSRTC ST Bus esakal
नाशिक

MSRTC Bus Planning : उन्हाळी सुट्टीसाठी मालेगाव आगारतर्फे जादा बसेस! या शहरांसाठी असणार अतिरिक्त फेऱ्या

पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर शहरासाठी अतिरिक्त फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा

MSRTC Bus Planning : शालेय परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. याच गृहीत धरुन मालेगाव बस आगाराने जादा बसेसचे प्लानिंग केले आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त सोमवार (ता. १) पासून ते १० जून २०२२ पर्यंत जादा बसफेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. (MSRTC Bus Planning Extra Buses by Malegaon Agar for Summer Vacation nashik news )

मालेगाव आगरमधून जाणाऱ्या जादा बसेसचे वेळापत्रक दर्शविणारे तक्ता.

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज अतिरिक्त एसटी फेऱ्या चालवण्याचा निर्णय आगाराने घेतला आहे. यामुळे नियमित फेऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.

दरम्यान लग्नसराईचा काळ बघता स्थानक-आगारांत वाढत असलेली गर्दी आणि बसेसच्या वाढीव फेऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

उन्हाळी सुट्टीचे नियोजन बघता मालेगाव आगारातर्फे एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार १ में ते १० जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या गावांसह शहरांमध्ये एसटीच्या जादा बस धावणार आहेत.

जादा बसेसमध्ये मालेगावहून पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख मनिषा देवरे यांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सुट्टीनिमित्त पर्यटनस्थळे, देवस्थाने येथे जाण्याकडे प्रवाशांचा मोठा कल असतो. दरम्यान बस प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना तिकीटदरात पन्नास टक्के सवलत मिळाल्याने प्रवासीसंख्या वाढीचा लाभ अपेक्षित आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज एसटी अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

"एसटी महामंडळाने उन्हाळी हंगामात जादा बसेसचे नियोजन केले असल्याने आनंदाची बाब आहे. प्रवाशांनीही खासगी वाहनांचा वापर न करता लांबपल्यासाठी महामंडळच्या बसमधून प्रवास करावा." - प्रभाकर वारूळे, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT