ST Bus esakal
नाशिक

नाशिक : 38 एसटी कर्मचारी सेवेत रुजू; दिवसभरात धावल्या 100 बस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासकीय सेवेत विलिनीकरणासाठी एकीकडे दोन महिन्यापासून एसटी (ST) कर्मचारी हे संपावर बसलेले आहे. तर दुसरीकडे संपातील अनेक कर्मचारी हे पुन्हा सेवेत देखील परतत आहे. नाशिक विभागात गुरुवारी (ता. ६) ३८ कर्मचारी हे कामावर परतले. यामुळे जिल्ह्यातील २५ टक्के एसटी कर्मचारी हे सेवेत आले आहे. यातच दिवसभरात १०० बस धावल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आज प्रशासनाकडून दोन कर्मचारी हे बडतर्फे तर २२ कर्मचाऱ्यांना आरोपपत्र देण्यात आले. (MSRTC Strike)

दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर गेले आहे. संपावर गेल्याने शासनाने दिलेले ४० टक्के पगारवाढ देखील या कर्मचाऱ्यांनी नाकारत संप कायम ठेवला आहे. यामुळे प्रशासनाकडून आता कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्याची कारवाई केली जात आहे. नाशिक विभागात गुरुवारी (ता.६) दोन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले. यामुळे बडतर्फे कर्मचाऱ्यांची संख्या ३६ वर गेली आहे.
एकीकडे कर्मचारी बडतर्फे केले जात असतान दुसरीकडे सेवेत पुन्हा रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ३८ कर्मचारी हे गुरुवारी सेवेत परतले. यामुळे कामावर परतल्यांची संख्या आता बाराशेच्या घरात पोहचली आहे. गुरूवारी जिल्ह्यात ९७८ कर्मचाऱ्यांनी हजेरी लगावली.

जिल्ह्यात धावल्या १०० बस

कर्मचारी परतत असल्याने एसटीच्या फेऱ्या देखील वाढू लागल्या आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात १०० बस धावल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. यामध्ये नाशिकमधून २४ शिवशाही, १७ लालपरी, मालेगाव (३), सटाणा (१), सिन्नर (१५), नांदगाव (३), इगतपुरी (१०), लासलगाव (१५), येवला (११) आणि पिंपळगाव (८) या डेपोंमधून १०२ बसेस धावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT