MSRTC Women Ticket discount esakal
नाशिक

MSRTC Women Ticket Discount : सवलतींमुळे लालपऱ्या हाऊसफुल! 3 महिन्यात 15 कोटी महिलांनी केला प्रवास

गोकुळ खैरनार

MSRTC Women Discount : राज्य शासनाने एसटीतील प्रवासासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ६५ ते ७५ वर्ष वयोगटातील नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास आहे.

महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट मिळत आहे. या योजनेतंर्गत तीन महिन्यात १५ कोटीहून अधिक महिलांनी बसने प्रवास केला असून साडेनऊ महिन्यात अकरा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला.

या सवलतींमुळे राज्यात सर्वत्र लालपरी हाऊसफुल आहेत. शाळा - महाविद्यालये सुरु झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर जून महिन्यात देखील बसस्थानके गर्दीने फुलून गेली आहेत. (MSRTC bus House full due to discounts 15 crore women traveled in 3 months nashik news)

खासगी प्रवासी वाहतुकीच्या ओझ्याखाली लालपरी दबून गेली होती. दिवाळी, उन्हाळी सुट्या, सण-उत्सव व यात्रा-जत्रा वगळता इतर वेळेत एसटीला प्रवाशांची वाणवा जाणवत होती. अनेकवेळा बोटावर मोजण्याइतके प्रवासी घेऊन बसेस धावत.

खासगी वाहतुकीचे जाळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातही खोलवर रुजले गेल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या प्रवासी अभावी बंद कराव्या लागल्या. गेल्यावर्षी एसटीच्या संपामुळे खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. संपकाळात खासगी वाहतुकीकडे वळलेले प्रवासी पुन्हा लालपरीकडे वळविण्याचे मोठे आव्हान शासन व एसटी प्रशासनापुढे उभे होते.

शासनाने २६ ऑगस्ट २०२२ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अमलात आणली. ७५ वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास सुरु झाल्याने एसटीतील प्रवाशांची संख्या वाढली. २६ ऑगस्ट ते १५ जून या कालावधीत ११ कोटी ४३ लाख ४२ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनेमुळे वृध्द नागरिकांची लग्न सोहळे व इतर कार्यक्रमांमधील संख्या वाढली. राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर देखील ज्येष्ठांचा वावर वाढला. शासनाने १७ मार्च २०२३ ला महिला सन्मान योजना जाहीर केली.

या योजनेंतर्गत सर्व वयोगटातील महिलांना (७५ वर्षाखालील) तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली. या योजनेला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. सवलतीच्या योजनांचा सर्वाधिक फटका खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

"सामान्य, गरीब जनतेला न्याय मिळावा हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून एसटीत वृध्द नागरीकांना मोफत तर माता भगिनींना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वृद्धांबरोबरच महिलांचा प्रवास वाढल्याने कुटुंब व नातेवाईकांमधील संवाद वाढला आहे."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT