Mucormycosis Sakal
नाशिक

नाशिकच्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना औरंगाबादला हलविण्याची नाचक्की

अरूण मलाणी

नाशिक : म्‍युकरमायकोसिसचे (mucormycosis) निदान झालेल्‍या दोन रुग्‍णांना रविवारी (ता. ३०) रात्री उशिरा औरंगाबाद येथील घाटी वैद्यकीय महाविद्यालयात ( ghati medical hospital) हलविल्‍याची माहिती समोर येत आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सुविधा उपलब्‍ध नसल्‍याने अन्‍य काही रुग्‍णांना औरंगाबादला हलविण्याचा सल्‍ला दिला जात असल्याचेही समजते. तर काही रुग्‍ण शहरातीलच अन्‍य रुग्‍णालयांत दाखल केले जात आहेत.(mucomycosis-Patients-shifted-to-Aurangabad-nashik-marathi-news)

रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांची हेळसांडच!

जिल्ह्यात म्‍युकरमायकोसिसचे जवळपास ३३८ रुग्‍ण असून, यापूर्वीच ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्‍शनच्या तुटवड्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्‍यातच नाशिकच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल होणाऱ्या रुग्‍णांना आता औरंगाबादला हलविण्याचा सल्‍ला दिला जातोय. टास्क फोर्सच्या गेल्‍या १५ मेस झालेल्‍या बैठकीत जिल्‍हा रुग्‍णालयासह एकूण पाच ठिकाणी सुसज्‍ज ऑपरेशन थिएटर उभारले जाणार असल्‍याचे सांगण्यात आले होते. जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत नामवंत खासगी डॉक्‍टरांनी येथे सेवा देण्यासही हमी दर्शविली होती. मात्र, सद्यःस्‍थितीत तरी रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांची हेळसांडच होताना दिसत आहे. आरोग्‍य क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्‍या नाशिकमधूनच रुग्णांना औरंगाबादला हलविण्याची नाच्चकी सध्या ओढावत आहे. या रुग्‍णांना औरंगाबादला हलविण्यापूर्वी नाशिकच्‍या अन्‍य दोन रुग्‍णालयांत दाखल केल्‍याचेही समजते. परंतु, नातेवाईक तेथून रुग्‍णास पुन्‍हा जिल्‍हा रुग्‍णालयात घेऊन आल्‍याने अखेर औरंगाबादला रुग्‍ण हलविण्यात आल्‍याची माहिती आहे. तसेच, जिल्‍हा रुग्‍णालयाकडून संदर्भीत काही रुग्‍णांना औरंगाबादला घेऊन जाणे शक्‍य नसल्‍याने त्‍यांच्‍या नातेवाइकांकडून शहरातीलच अन्‍य काही रुग्‍णालयांत चाचपणी केली जात आहे.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण असल्‍याने गुंतागुंत

यासंदर्भात जिल्‍हा रुग्‍णालयाची बाजू जाणून घेतली असता, म्युकरमायकोसिसग्रस्‍त रुग्‍ण ॲक्‍टिव्‍ह असल्‍याने उपचारात गुंतागुंत येत असल्‍याचे सांगण्यात आले. कोरोनामुक्‍त होऊन निर्धारित कालावधी पूर्ण झालेला नसल्‍याने अशा रुग्‍णांवर शस्त्रक्रियेची प्रक्रिया वेगळी असल्‍याचेही सांगितले. तर एक रुग्‍ण औरंगाबादला हलविल्‍याबाबत दुजोरा देण्यात आला. परंतु, पंचवीस रुग्‍ण हलविल्‍याचा दावा निराधार असल्‍याचेही सूत्रांनी नमूद केले.

वैद्यकीय सुविधांबाबत नाशिकचे नाव राज्‍यभर असताना येथील रुग्‍णाला औरंगाबादला हलविणे ही नाच्चकी आहे. परिस्‍थितीचे गांभीर्य लक्षात घेता जलद गतीने नाशिकला सुविधा उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करणार आहे.-ॲड. अजिंक्‍य गिते, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT