MUHS latest marathi news
MUHS latest marathi news esakal
नाशिक

MUHS Exam : आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या तिसऱ्या टप्‍यातील परीक्षा आजपासून

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-२०२२ परीक्षा सध्या सुरु आहे. तिसऱ्या टप्‍यातील लेखी परीक्षेला उद्या (ता.१८) पासून सुरवात होत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू म्‍हणाले, की हिवाळी सत्र-२०२२ मधील परीक्षेचा तिसऱ्या टप्यांत राज्यातील एकूण १०४ परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.(MUHS Exam Third Phase Exam of Health Sciences University from today nashik news)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

या परीक्षेसाठी सुमारे पस्‍तीस हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे म्‍हणाले, की विद्यापीठाकडून नियोजित वेळापत्रकानुसार हिवाळी सत्रातील तिसऱ्या टप्‍यातील परीक्षा ३ फेब्रुवारीपर्यंत पार पडेल.

याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाचे एमबीबीएस (२०१९ सीबीएमई), प्रथम, द्वितीय व तृतीय व अंतिम वर्षासह बीडीएस, बीएचएमएस (नवीन व २०१५), बी.पीएच. (वर्ष २०२१२), बी.ओटीएच. (वर्ष २०१५), बीपीओ (वर्ष २०१७) यांसह पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे एमएस्सी. नर्सिंग, एमपीटीएच., एमपीटी या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT