The representatives of the institutions along with Vice Chancellor Lt Gen (retd) Dr. Madhuri Kanitkar were present on the occasion.
The representatives of the institutions along with Vice Chancellor Lt Gen (retd) Dr. Madhuri Kanitkar were present on the occasion. esakal
नाशिक

MUHS University : आरोग्‍य विद्यापीठाचा हावर्ड विद्यापीठ, सी-डॅक, ओमनीक्युरससोबत सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठात ‘डेटा सायन्स इन हेल्थकेअर फॉर एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड पब्लिक हेल्थ’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी हावर्ड युनिव्हर्सिटी, सी-डॅक आणि ओमनीक्युरस या संस्थांसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार आदान-प्रदान कार्यक्रम पार पडला. (MUHS University MoU of Health University with Howard University C DAC Omnicurus nashik news)

विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर अध्यक्षस्थानी होत्‍या. या प्रसंगी प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, हावर्ड विद्यापीठाच्या आयटूबीटू ट्रानस्मार्ट फाऊंडेशनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कवीश्वर वाघोलीकर, सी-डॅकचे कार्यकारी संचालक विवेक खनिजा, ओमनिक्युरस संस्थेच्या प्रतिनिधी सौम्या जयकृष्णन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.

सामंजस्य करार पत्राचे आदान-प्रदानाप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले ऑनलाइन उपस्थित होते. डॉ. दिलीप म्हैसेकर म्‍हणाले, की विद्यापीठाचा तंत्रज्ञान व संशोधन संदर्भातील सामंजस्य करार उपक्रम महत्त्वाचा आहे.

आरोग्य क्षेत्राशी निगडित माहिती, विश्‍लेषणाची गरज असून, विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा. डॉ. अजय चंदनवाले म्‍हणाले, की वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसंख्येच्या डेटाचा वापर व्यापक प्रमाणावर संशोधनासाठी होईल.

प्रति-कुलगुरू डॉ. निकुंभ म्‍हणाले, की विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे संशोधनासाठी लागणारा डेटा सुकररित्या उपलब्ध होईल. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनी डेटा सायन्ससंदर्भात संशोधन करावे.

कुलसचिव डॉ. बंगाळ प्रास्ताविकात म्‍हणाले, की संशोधन, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम केल्यास समाजाला उपयोग होईल.
डॉ. कवीश्वर वाघोलीकर यांनी डेमो ऑफ क्युराटेड डेटा सर्च पोर्टल टू अॅडव्हांस हेल्थकेअर विषयावर मार्गदर्शन केले.

ते म्‍हणाले, की रुग्णांच्या तपासणीनंतर त्याच्या आरोग्यासंबंधी तपशील, रुग्ण संख्या, वय, प्रदेश, उपचार पध्दतींची संकलित माहितीवर प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्राध्यापक डॉ. अभिनंदन जाधव यांनी इम्लिमेंटेशन इन सिव्हिल हॉस्पिटल विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर वाढल्‍याने डॉक्टरांना अधिकाधिक रुग्णांची तपासणी कमी वेळेत करता येते.

रोगाच्‍या निदानासाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन अध्यासनाच्या डॉ. पायल बन्सल यांनी युसिंग रेकॉर्ड्स सर्चिंग पोर्टल फोर एज्युकेशन विषयावर मार्गदर्शन केले.

हावर्ड विद्यापीठाचे मॅसच्युसेट जनरल हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ. शॉन मर्फी यांनी स्टेटस इन ग्लोबल नॉर्थ विषयावर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, की विविध प्रकारची माहितीचे संकलन व त्यावर संशोधनासाठी आवश्यक प्रक्रिया केली जाते. प्राप्त माहिती विशिष्ट पद्धतीत गोपनीय ठेवली जाते. कोविडकाळात जमा केलेली माहिती उपचार पद्धती शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. चित्रा नेतारे यांनी आभार मानले. कार्यशाळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सहायक संचालक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, जितेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

आरोग्‍य क्षेत्रात डेटा सायन्‍स महत्त्वाचा : डॉ.कानिटकर

कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी डेटा सायन्सला प्रचंड महत्त्व आहे. देशात मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्‍ध असून, त्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण आणि विश्लेषण केल्यास, निष्कर्षांचा समाजातील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी लाभ होईल.

अचूक उपचारासाठी रुग्णांच्या आजारासंबंधी माहिती, त्याचे पृथ्थकरण आवश्यक असते. यासाठी तंत्रज्ञानाच्‍या साहाय्याने जलद गतीने माहिती संकलन व प्रक्रिया करणे शक्‍य होते. आरोग्य क्षेत्रात संशोधन कार्याला चालना देण्यासाठी विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी निगडित संस्थांशी सामंजस्य करार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT