सेकंड मेन
फोटो : H34748
---
मुहूर्त ट्रेडिंगमधून मोठी उलाढाल
यंदा प्रथमच दिवसा व्यवहार; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासासाठी शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले जाते. या मुहूर्त ट्रेडिंगबाबत गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. तासाभरात मोठी उलाढाल नाशिकसारख्या शहरातून झाली. दरम्यान यंदा प्रथमच दुपारच्या वेळी २ वाजून २० मिनिटांपासून ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत शेअर बाजार व्यवहारांसाठी खुला केला होता.
चांगला परतावा मिळत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचा कल वाढला आहे. विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकीवर भर असतो. दरवर्षी दिवाळी उत्सवादरम्यान आयोजित केले जाणारे मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र गुंतवणूकदारांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्र असते. या एक तासाच्या विशेष सत्रात केलेली गुंतवणूक वर्षभर वृद्धींगत होत राहाते, अशी धारणा आहे. त्यामुळे या मुहूर्ताचे महत्त्व लक्षात घेता, अनेक ब्रोक्रेज कंपन्यांनी खरेदीच्या संभाव्य पर्यायांची माहिती जारी केली होती. तसेच अपेक्षित परताव्याचा अंदाज वर्तविला होता. यापूर्वीपर्यंत मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र सामान्यतः सायंकाळच्या वेळी आयोजित केले जायचे. परंतु यंदा प्रथमच दुपारी हे सत्र पार पडले. तासाभराच्या या सत्रातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
----चौकट
आकर्षक सजावट,
मिठाईचे वाटप
मोबाईल ॲपद्वारे थेट शेअर खरेदीची सुविधा उपलब्ध असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी या पर्यायाचा अवलंब केला. परंतु अद्यापही काही गुंतवणूकदार आपल्या ब्रोकरमार्फत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत मागणी नोंदवत असतात. अशा ग्राहकांसाठी शेअर ट्रेडिंग कंपन्यांची दालने सजविण्यात आली होती. तसेच मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान मिठाईचे वाटप केले गेले.
---चौकट
बाजारपेठेचा कल
ठरला महत्त्वाचा
गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु गेला आठवडाभरात बाजारात तेजी बघायला मिळाली. बाजारपेठेचा कल लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्तपणे खरेदी करत मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र अविस्मरणीय बनविले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.