मुहूर्त ट्रेडिंगबाबत उत्सुकता; शेअर बाजारात चैतन्य
दिवाळीदरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा चालत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरु असतांना, सध्या अनेक कंपन्यांचे शेअर आकर्षक दरांमध्ये उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदीबाबत उत्सुकता बघायला मिळते आहे. थेट भांडवल बाजारात तसेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
वाढती महागाई, उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आदी कारणांमुळे आता चांगला परतावा मिळवून देणाऱ्या पर्यायांची सध्याच्या घडीला निवड केली जात आहे. पारंपरिक गुंतवणूक पर्याय अधिक सुरक्षित मानले जात असले तरी मिळणारा परतावा कमी असल्याने, गुंतवणूकदार नवनवीन पर्यायांची चाचपणी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेअर बाजारात थेट गुंतवणूक तसेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातील गुंतवणुकीकडे सर्वाधिक कल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिर वातावरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु, आता शेअर बाजाराला आधार मिळालेला असून, घसरण थांबली आहे. सद्यःस्थितीत अनेक कंपन्यांचे शेअर्स रास्त दरांमध्ये उपलब्ध झाले असून, त्याची जोरदार खरेदी होते आहे.
---
क्षेत्रनिहाय पर्यायांना पसंती
शेअर असो किंवा म्युच्युअल फंड यांमध्ये ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल, पायाभूत सुविधा असे क्षेत्रनिहाय गुंतवणूक संधी देणाऱ्या योजना उपलब्ध केल्या जात आहेत. अनेक गुंतवणूकदार या क्षेत्रांचा अभ्यास करून व भविष्याचा अंदाज घेताना गुंतवणूकीस प्राधान्य देत आहेत.
-----
सुलभ पर्यायांमुळे गुंतवणुकीस प्रोत्साहन
वाढत्या स्पर्धेत अनेक ब्रोकरेज सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसोबत आता युपीआय सेवा पुरवठादार देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देत आहेत. अगदी एक रुपयापासून गुंतवणूक सुविधा दिली जाते आहे. त्यामुळे गुंतवणूक रक्कम वाढीसाठी प्रोत्साहन मिळते आहे. व कुठल्याही मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करणे शक्य झाले आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.