नाशिक

आध्यात्मिक चैतन्य आणि पर्यटन समृद्धीचा संगम

CD
(दिवाळी अंक लेख) ----- NSK26H32302 मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाईंचे मंदिर. ----- NSK26H32303 मुक्ताईनगर : कोथळी येथील मंदिरातील मूर्ती. ----- NSK26H32304 (ह.भ.प. दुर्गाताई मराठे) आध्यात्मिक चैतन्य आणि पर्यटन समृद्धीचा संगम ----------------------------------------- श्री क्षेत्र मुक्ताईनगर- कोथळी ​ वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडात आदिशक्ती संत मुक्ताबाईंचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण, प्रगल्भ आणि वंदनीय आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या कुशीत वसलेले ‘मुक्ताईनगर-कोथळी’ हे क्षेत्र केवळ वारकऱ्यांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान उरले नसून, ते आज एक प्रमुख आध्यात्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. - ह.भ.प. दुर्गाताई मराठे ​​संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या भगिनी मुक्ताबाई यांनी लहान वयातच आपल्या प्रखर अध्यात्मज्ञानाने आणि अभंगवाणीने वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत केला. जेव्हा संपूर्ण समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे दुःखी होऊन ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतले, तेव्हा मुक्ताबाईंनी अत्यंत करुणेने आणि तत्त्वज्ञानाने नटलेले ‘ताटीचे अभंग’ रचले. योगी पावन मनाचा। साहे अपराध मनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा...॥ या अभंगांमधून त्यांनी जगाला सहनशीलता आणि खऱ्या संताची लक्षणे समजावून सांगितली.१४०० वर्षांची तपश्चर्या आणि सिद्धींचा अहंकार असणाऱ्या चांगदेव महाराजांचा गर्वहरण करून त्यांना अद्वैत भक्तीची दीक्षा देण्याचे महान कार्य संत मुक्ताबाईंनी केले. ​अंतिम अंतर्धान रहस्य तापी नदीच्या काठावर कोथळी येथे वैशाख वद्य दशमीला अचानक विजांचा कडकडाट झाला आणि ‘कडाडली निरंजनी जेव्हा, मुक्ताई गुप्त झाली तेव्हा’ या अभंगाच्या आख्यायिकेनुसार संत मुक्ताबाई त्या प्रखर विजेच्या तेजात तापी पात्रात अंतर्धान पावल्या. हेच पावन स्थळ आज ''मुक्ताईनगर-कोथळी'' म्हणून विश्वाचे ध्यान वेधून घेत आहे. ​स्थापत्य, निसर्ग आणि पर्यटन समृद्धी ​कोथळी येथील मुक्ताई मंदिर परिसर धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटन यांचा एक अद्भुत संगम आहे. वास्तुकला आणि मंदिर परिसर: नागर शैलीतील हे भव्य मंदिर, चौकोनी खांबांचा सभामंडप आणि सुबक उरूशृंग शिखर पर्यटकांचे मन मोहून घेते. गर्भगृहातील मुक्ताबाईंची प्रसन्न संगमरवरी मूर्ती भक्तांना आत्मिक शांतता प्रदान करते. ​हतनूर धरणाचे बॅकवॉटर निसर्ग: मंदिराच्या मागच्या बाजूला पसरलेला हतनूर धरणाचा विस्तीर्ण जलसाठा आणि आजूबाजूची हिरवळ या क्षेत्राला निसर्गरम्य पर्यटनाचा दर्जा मिळवून देते. ​प्रमुख धार्मिक सोहळे ​आषाढी वारी पालखी सोहळा : ३५० पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली संत मुक्ताई पालखी आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरकडे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला येथून प्रस्थान करते. या पालखी सोहळ्याला वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहे. आदिशक्ती मुक्ताई ची पालखी पंढरपुरात प्रवेश केल्याशिवाय इतर संतांच्या मानाच्या पालख्या प्रवेश करीत नाहीत, इतका मोठा अधिकार आपल्या मुक्ताईचा आहे. तसेच आषाढी पौर्णिमेला मानाचा महानैवेद्य देखील संत मुक्ताईकडून विठूरायाला अर्पण केला जातो. ​ महाशिवरात्री व माघ यात्रा : चांगदेव-मुक्ताई गुरु शिष्य भेटीचा सोहळा म्हणून विजया एकादशी व महाशिवरात्री निमित्ताने येथे मोठा यात्रोत्सव भरतो, या माध्यमातून या भव्य यात्रोत्सवात लाखो भाविक दाखल होतात. ​आज मुक्ताईनगर-कोथळी हे क्षेत्र पायाभूत सुविधांनी सज्ज झाले आहे. या क्षेत्राने ​प्रगत पर्यटन स्थळ म्हणून नवी ओळख निर्माण केलेली आहे. ​उत्तम कनेक्टिव्हिटी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ मुळे हे क्षेत्र थेट जोडले गेले आहे. जवळच भुसावळ आणि जळगाव ही प्रमुख रेल्वे जंक्शन असल्यामुळे तसेच पूर्वेला मलकापूर आणि दक्षिणेला नाडगाव - बोदवड रेल्वे स्टेशन वाहतूक अत्यंत सुलभ आहे. आधुनिक सुविधा : भाविकांसाठी प्रशस्त भक्तनिवास, ओवऱ्या, भोजन कक्ष, घाट परिसर विकास आणि माहिती केंद्र उभारण्यात आले आहेत. ​संत मुक्ताबाईंचा आध्यात्मिक वारसा, तापी काठाचे सौंदर्य आणि विकसित होत असलेल्या सोयी-सुविधांमुळे मुक्ताईनगर-कोथळी हे खानदेशच्या संस्कृतीचा व पर्यटनाचा अनमोल मुकुटमणी ठरत आहे. या पावन भूमीस दिलेली भेट ही प्रत्येक पर्यटकाला आध्यात्मिक ऊर्जेचा आणि निसर्गाच्या शांततेचा अनुभव देते. (लेखिका मुक्ताईनगर येथील कथावाचक तथा कीर्तनकार आहेत.) ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर हेक्टरी एक लाख रुपये भरपाईसाठी आंदोलन करणारे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

Shirur Crime : शिरूर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारात दोन गटांत झोंबाझोबीसह लाथाबुक्क्यांची फ्रि स्टाईल; महिलांचाही सहभाग

SCROLL FOR NEXT