नाशिक

बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा..आम्ही चुकलो...!

CD
YEO26B27081 येवला : मुक्ती महोत्सवात आयोजित काव्य संमेलनात सहभागी पदाधिकारी व कवी. -------------- आम्ही चुकलो, आम्ही झुकलो म्हणून यशाला मुकलो! ----------- धर्मांतर घोषणा वर्धापनदिनानिमित्त येवल्यात मुक्ती महोत्सवात रंगले काव्य संमेलन ----------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ९ : धर्मांतर घोषणेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मुक्ती महोत्सव समितीतर्फे मुक्ती महोत्सवांतर्गत स्वरचित व अन्य कवि रचित काव्यांचे मुक्ती काव्य संमेलन उत्साहात झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विनोद सोनवणे होते. मुक्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे, संयोजक शैलेंद्र वाघ, बी. डी. खैरनार यांसह ॲड. समीर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुक्ती महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक, निमंत्रक शरद शेजवळ यांनी महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. ‘बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आम्ही शिकलो, बाबासाहेबांनी सांगितल संघटित व्हा, आम्ही चुकलो, बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष करा, आम्ही झुकलो म्हणून यशाला मुकलो....! ही प्रा. शरद पाडवी यांनी सादर केलेली मूलमंत्र कविता दाद मिळून गेली. "बुद्ध कबीर शिव फुले अन शाहू। भीम भगतसिंग आम्ही गाऊ लिहू।" कवी गजानन सूर्यकर यांनी सामाजिक प्रबोधनाची ही रचना सादर केली. तर कवी विशाल गरूड यांनी दोन लाखांचा फोन, सांगा शेतकऱ्यांचं कोण? नेते बांधावर आले, दुष्काळी पीक फोटो काढले, कोण विचारतो आज लेकरांनी काय खाल्लं ? यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. लोकशाहीर प्रा. शरद शेजवळ यांनी ‘हे काम संविधानाने केले, माणसा तुझं माणूस केले’ शिकारे-शिकारे, संघटित व्हारे, भीमा गौतमाने धडे घेत जा रे यासह प्रबोधनात्मक काव्यगित गझल सादर केल्या. कवी साहिल गायकवाड व बालकवी सिद्धार्थ गरुड, सार्थक पगारे, तेजस गोरे, ओम ढांबले, गौरव गायकवाड, प्रिन्स भालेराव, आशिष पगारे, सुमीत गरूड, समीर ढांभले यांनी सामाजिक, राजकीय व प्रबोधनात्मक काव्य, गित, गझल सादर केल्या. कवी विशाल गरुड यांनी सूत्रसंचालन केले. शैलेंद्र वाघ यांनी आभार मानले. YEO26B27080, YEO26B27081

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT