नाशिक

टुडे पान २ साठी.. अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती -- बहिणाबाई कविकट्ट्यार्फे बहुभाषिक कविता स्पर्धा धुळे : कवयित्री बहिणाबाई चौधरी कविकट्ट्यातर्फे बहुभाषिक कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, अहिराणी, इंग्रजी, आदिवासी आणि राजस्थानी (मारवाडी) या बोलीभाषेतील स्वकचित कविता पाठविण्याचे आवाहन कविकट्ट्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. यू. संघवी यांनी केले आहे. प्रत्येक कवितेखाली कवी किंवा कवयित्रीचे संपूर्ण नाव, सविस्तर पत्ता व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. निवडक आणि उत्कृष्ट कविता पुस्तकात छापल्या जातील आणि विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय वोत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान केली जातील. कविता प्रत्यक्ष किंवा पोचपावतीने प्राचार्य डॉ. के. उ. संघवी, शनिमंदीराजवळ वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे (पिन - ४२४००२) या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी मुरलीधर पांडे (९४२३९७८७४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. -- गंगामाई फार्मसीत क्रीडा नियोजन सभा धुळे : नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई फार्मसी महाविद्यालयात लोणेरे (जि. रायगड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागीय क्रीडा समितीची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची विशेष सभा पार पडली. संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार राम भदाणे, सचिव मनोहर भदाणे व उपाध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे यांच्या मार्गदर्शनात सभा झाली. यात क्रिकेट, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, आर्चरी, कराटे व स्विमिंगसह विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन, तारीख, ठिकाण निश्चिती आणि निवड समिती सदस्यांच्या नियुक्तीवर चर्चा झाली. बैठकीस सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. एम. सी. महंतेश, प्रा. डॉ. शरतान चौधरी आणि प्राचार्य सचिन चोरडिया उपस्थित होते. -- ऑलिम्पियाड कॅम्पसाठी प्रा. महेश पाटलांची निवड धुळे : मुंबईस्थित होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन तर्फे होणाऱ्या ‘बायोलॉजी ऑलिम्पियाड एक्सपोजर कॅम्प २०२६’ साठी धुळ्याचे प्रा. महेश सूर्यकांत पाटील यांची निवड झाली. देशभरातून निवड झालेल्या ५८ शिक्षकांमध्ये आणि महाराष्ट्रातून स्थान मिळालेल्या केवळ तीन शिक्षकांमध्ये त्यांचा समावेश आहे. हा कॅम्प मुंबई येथे सहा ते दहा ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. प्रा. पाटील हे बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज येथे जीवशास्त्र विभागाचे प्रमुख व सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या निवडीबद्दल बद्दल संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, प्राचार्य पी. बी. पाटील आदींनी कौतुक केले. -- मोराणेत मुलाखत पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा धुळे : जळगावस्थित सहसंचालक कार्यालय व उच्च शिक्षण संचालनालय यांच्या पुढाकाराने मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयात एकदिवसीय मुलाखत पूर्व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘रोजगार महाकुंभ’साठी नोंदणी केल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरली. उद्‌घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. विजय गर्गे यांनी साधन व्यक्ती म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीची पूर्वतयारी, योग्य ड्रेस कोड, भाषा कौशल्य, प्रभावी रेझुम लेखन आणि मुलाखतीतील अभ्यासपूर्ण मांडणी याविषयी मार्गदर्शन केले. प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड, कौशल्य विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र बैसाने, माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रा. डॉ. राहुल आहेर, आजीवन कक्षाच्या समन्वयक प्रा. डॉ. मेघावी मेश्राम यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT