नाशिक

जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

CD
नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; मजुरांना गावातच मिळणार रोजगार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे. राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी या सर्व सहा तालुक्यांद दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण मजुरांना त्यांच्या मागणीनुसार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासनाने गती दिली आहे. या योजनेतंर्गत जलसंधारण, मृद व जलसंधारण, शेतीपूरक कामे, वृक्षलागवड, फळबाग विकास, चारा विकास आदी अनुज्ञेय कामांना गती देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरजू मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देतानाच जलसंधारणाच्या माध्यमातून टिकाऊ मालमत्ता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण मजुरांचे रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ स्थापन झाला असून, त्यासाठी ०२५६४- २९९५४४ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत मजूर बांधवांच्या रोजगाराच्या मागण्या, तक्रारी व अडचणी नोंदवून संबंधित ग्रामपंचायती आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच, प्राप्त मागण्या व तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. या हेल्पलाईनवर संपर्क साधून रोजगाराची मागणी नोंदविणे. रोजगार उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रार नोंदविणे. रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध कामांची माहिती घेणे. रोजगाराशी संबंधित इतर अडचणी व तक्रारी नोंदविणे आदी माहिती अथवा मदत घेता येईल. -------- दुष्काळी परिस्थितीत रोजगाराच्या शोधात इतर राज्यात स्थलांतर करण्यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामस्थ व मजूर बांधवांनी ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’शी संपर्क साधून आपल्या रोजगाराची मागणी नोंदवावी, स्थानिक पातळीवर उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. - उषाराणी देवगुणे- दहिकर, उपजिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : संतप्त जमावाच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू ;शहरात पुन्हा झुंडबळी; चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने संताप

Manwat Farmers: घरातील साहित्य विकले, शेती गहाण ठेवली; थकीत बिलांसाठी मानवतमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

प्रदीप पूर्णेकरांच्या घरी Jayant Patil दाखल! नेमकं काय म्हणाले?

MPSC protest Pune : पुण्यातील MPSC आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला खडसावलं; 'विद्यार्थी समाजविघातक नाही...'

Dharashiv Sugarcane Farmers : ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या’, ओमराजे, तानाजी सावंतांसह आमदार, खासदारांना थेट इशारा, धाराशिवचे शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT