नाशिक

शिरपूर : दरोडा बातमी

CD
महामार्गावर तीन कोटींची रोकड लुटली सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २ : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला थांबवून संशयितांनी दोघांना मारहाण करीत व पळवून नेत तीन कोटी रुपयांची रोकड, मोबाईल व अन्य मुद्देमाल लुटून नेला. ही घटना ३१ ऑक्टोबरला मध्यरात्री पळासनेर (ता. शिरपूर) येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलापुढे घडली. सुनील शिवराम पटेल (वय ४६, रा. डिंडोली, सुरत) व शैलेश पटेल कार (एमएच ०४, डीएल)मधून भोपाळ (मध्य प्रदेश) येथून मुंबईकडे निघाले होते. पळासनेरजवळ पुलाचे काम सुरू असल्यामुळे त्यांच्या कारचा वेग मंदावला. ही संधी साधून त्यांना ओव्हरटेक करीत संशयितांनी आडवी लावत त्यांचा रस्ता अडविला. इनोव्हामधून खाली उतरलेल्या पाच ते सहा संशयितांनी सुनील व शैलेश पटेल यांच्या कारच्या दरवाजाची काच लोखंडी पाइपाने फोडली. दरवाजा उघडून दोघांना खाली उतरवून हत्यारांनी त्यांना बेदम मारहाण केली. दोघांना वेगवेगळ्या वाहनात डांबून पळवून नेत त्यांच्याकडील तीन कोटी सहा लाख रुपयांची रोकड, मोबाईल, आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा मुद्देमाल काढून घेतला. त्यांना कारमध्ये सोडून संशयितांनी पळ काढला. दरोडेखोरांच्या कारच्या नंबर प्लेटवर ‘डीएल’ अशी आद्याक्षरे असून, त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, अशी माहिती सुनील पटेल यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक कचरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT