नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : मुंबई- आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर गवत आणि झाडींचे साम्राज्य : अपघात घडण्याची भीती : वाहनचालक त्रस्त :

CD
08896 माणिकखांब : महामार्गावरील दुभाजकांवर वाढलेले गवत व झुडप. मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर गवत, झुडपांचे साम्राज्य अपघात घडण्याची भीती; वळणांवर प्रवास करणे बनले धोकादायक सकाळ वृत्तसेवा इगतपुरी,ता.३ : मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महामार्गाच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि झाडी वाढली असून त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यानंतर महामार्गाच्या दुभाजकांवर उगवलेल्या या गवत व वनस्पतींची योग्य वेळी छाटणी न केल्यामुळे हे गवत अत्यंत उंच वाढले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारी वाहने, वळणांवर समोरून येणारी वाहतूक किंवा अचानक रस्ता ओलांडणारे प्राणी व नागरिक वाहनचालकांना वेळेवर दिसत नाहीत. परिणामी, अचानक ब्रेक दाबावा लागल्याने किंवा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या वाढलेल्या झाडीमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि तीव्र वळणांवर प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश आणि दुभाजकांवरील झाडीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे स्थानिकांसह नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून संबंधित विभागाने हे गवत व झाडी हटवण्याची मागणी केली आहे. ------------------------------ प्रतिक्रिया : महामार्गावर मागील काही महिन्यांपासून विविध समस्या जाणवत आहेत. त्यात पुन्हा दुभाजकांवर वाढलेल्या गवताची भर पडली आहे.वास्तविक पाऊस थांबल्यावर हे सर्व गवत व झाडी काढून साफसफाई करणे गरजेचे होते. मात्र आता पाऊस गेल्यानंतरही हे काम सुरु होत नाही. - कमलेश शिरोडे, वाहनधारक, ठाकूरवाडी -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Latest Marathi News Live Update: जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही -मंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT