पान-३ सर्व
३६-२
मुंबई - नागपूर दरम्यान
दिवाळीसाठी जादा रेल्वे
आजपासून १३ नोव्हेंबरपर्यत सुविधा
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता. ३ ः मध्यरेल्वेतर्फे दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुविधा असून त्यासाठी विशेष शुल्क असेल. बुधवारपासून (ता.४) हे आरक्षण उफलब्ध असेल.
----------
मध्य रेल्वेतर्फे सोडण्यात येणाऱ्या जादा रेल्वेगाड्या अशा ः नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर विशेष गाडी (८ सेवा) क्रमांक ०१०८३. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ व ८, ११ आणि १३ नोव्हेंबरला १७.०५ ला सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सातला पोहोचेल.
गाडी ०१०८४ ही नागपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून ५, ७, १०, १२ नोव्हेबरला १३.३० ला सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहाला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर या विशेष गाडीच्या चार सेवा असतील. गाडी ०१०८५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर विशेष गाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ७ आणि ९ नोव्हेंबरला १५.२५ ला सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ७.०० ला पोहोचेल.
गाडी ०१०८६ नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूरहून ८ आणि १० तारखेला १३.३० ला सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ५.२५ ला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.