नाशिक

मुंबई नाक्यावरील खासगी बस पार्किंग हटवा

CD
टूडे साठी ---------- मुंबई नाक्यावरील खासगी बस पार्किंग हटवा तपोवनात हलवा; एसटी महामंडळाचे आयुक्तांना पत्र सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकाशेजारी महापालिकेच्या जागेत सुरू असलेले खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग बेकायदा असून ते तातडीने हटवून तपोवनातील पार्किंगमध्ये स्थलांतरित करावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे केली आहे. सदर खासगी बस पार्किंग तपोवनात हलविण्याची विनंती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने महामंडळाने ही भूमिका घेतली आहे. महामार्ग बसस्थानकाला लागूनच महापालिकेच्या जागेत खासगी बसेस उभ्या केल्या जातात. तिथूनच प्रवासी चढउतार होतो. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असून त्याचा थेट फटका एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला बसत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नाशिक विभाग नियंत्रकांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. औरंगाबाद खंडपीठाने अवैध वाहतुकीबाबत दिलेल्या आदेशात एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी करून प्रवासी घेण्यास किंवा उतरविण्यास स्पष्ट मनाई केली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस, परिवहन आणि प्रशासन यंत्रणांना देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने महामंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बसस्थानक परिसर मोकळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई नाका परिसरातील खासगी बस पार्किंग बंद करून ते तपोवन येथे उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या जागेत हलवावे, अशी विनंती महामंडळाने पत्रात केली आहे. तपोवनात जागा उपलब्ध असल्याने तिथे पार्किंग हलविल्यास बसस्थानक परिसरातील कोंडीही सुटेल आणि अवैध वाहतुकीलाही आळा बसेल, असा महामंडळाचा दावा आहे.या पत्राची प्रत पोलीस उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस उपायुक्त यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे. आता महापालिका या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे एसटीसह प्रवाशांचेही लक्ष लागले आहे. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT