नाशिक

लोक संघर्ष मोर्चाच्या मागण्यांना

CD
NSK26H33812 मुंबई : लोकसंघर्ष मोर्चाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देताना प्रतिभा शिंदे. शेजारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील. ------- लोकसंघर्ष मोर्चाच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिवाळीपूर्वी निर्णय न झाल्यास आंदोलक मुंबईकडे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : आदिवासी, वनहक्कधारक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोक संघर्ष मोर्चातर्फे १२ ऑक्टोबरपासून हजारो आदिवासींच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित प्रश्नांवर शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली आहे. या मागण्यांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुमारे ३० मिनिटे चर्चा करण्यात आली. या वेळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संबंधित विषयांवर चर्चा झाली. यापूर्वी मंत्री महाजन, मंत्री पाटील आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार लोकसंघर्ष मोर्चाने सातत्याने पाठपुरावा केला. महसूल व वन विभागाच्या २५ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार पात्र मंजूर तसेच प्रलंबित वनहक्क दावेदारांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा, यासह आठ प्रमुख मागण्या चर्चेत मांडण्यात आल्या होत्या. चौकट शासन निर्णयांत रूपांतर व्हावे : प्रतिभा शिंदे संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून मागण्यांबाबत स्पष्ट आणि अंमलबजावणीयोग्य शासन निर्णय काढणे आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी संबंधित शासन निर्णय निघाले नाहीत, तर लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली किमान ५० हजार आदिवासी शेतकरी मुंबईकडे कूच करतील, असा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT