Kailas jadhav Nashik.jpg Sakal
नाशिक

तिसऱ्या लाटेत लहान मुलांचे आरोग्य जपा - आयुक्त कैलास जाधव

विक्रांत मते

संभावित कोविड तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त जाधव यांनी नाशिककरांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.


नाशिक : कोरोनाच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांनी संयम, शिस्त व धैर्य दाखविल्याने कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यात यश आले. हेच धैर्य आता तिसऱ्या लाटेत दाखविण्याची गरज आहे. या लाटेत लहान मुलांना जपा, वाढदिवसाच्या कार्यक्रमांना उत्सवाचे स्वरूप न देता कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी केले. Municipal Commissioner appeals to take care of children's health in the third wave of Corona


संभावित कोविड तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त जाधव यांनी नाशिककरांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की साथीच्या आजारांची लक्षणे आढळून आल्यास महापालिकेच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अनावश्‍यक फिरणे टाळावे, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांचे आरोग्य जपण्याचे महत्त्वाचे काम पालकांना करावे लागणार आहे. अनावश्‍यक घराबाहेर जाऊ नका, लहान मुलांना बाहेर फिरू देऊ नका, वाढदिवसाचे कार्यक्रम कौटुंबिक वातावरणात साजरे करावे, घरगुती कार्यक्रमांना उत्सवाचे स्वरूप देऊ नका.


प्रशासनाला सहकार्याची गरज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करताना नागरिकांच्या सहकार्याचीही गरज असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. पोस्ट कोविडमध्ये वेगवेगळे आजार येत असून, सातत्याने त्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोना उपचारातून रुग्ण बरा झाल्यानंतर म्युकरमायकोसिसचे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. टास्क फोर्सच्या नियमांचे पालन करावे. कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे. कमीत कमी नागरिकांना त्रास होईल, यासाठी एकत्र येऊन सर्वांनी प्रयत्न करावेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नाशिककरांनी शिस्त, धैर्य राखले. हीच अपेक्षा संभावित तिसऱ्या लाटेमध्ये आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेच, परंतु नागरिकांचीही साथ हवी आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT