आयुक्तांसह तिघांना
न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ३१ : येथील महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्विय सहाय्यक निलेश पाटील तसेच लेखापाल हरिश डिंबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ( ता. ३० ) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तिघांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
येथील एका ठेकेदाराकडून ८० हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्त जाधव यांच्यासह तिघांना गुरुवारी ( ता. २९ ) अटक केली होती. मुंबईकडे जात असताना घोटी नजीक त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. येथील किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली .
संशहितांचे वकील ॲड. वासिफ म्हणाले, की किल्ला पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्या घरांची तपासणी केली. तिघांच्या घरातून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही कागदपत्रे व पुरावे सापडले नाहीत. तिघांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शनिवारी (ता. ३१) जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सुनावणी दरम्यान तपास अधिकारी यांचे म्हणणे ऐकले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त जाधव शनिवारी ( ३१ ) प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.