woman self relaint.jpeg
woman self relaint.jpeg 
नाशिक

GOOD NEWS : महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी महापालिकेचे विशेष पॅकेज..महिलांनी आवाज उठविल्यानंतर प्रथेला ब्रेक

सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : महिला व बालकल्याण विभागाच्या पाच टक्के राखीव निधीतून शहरातील 1100 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठीचा प्रस्ताव ऑनलाईन महासभेवर ठेवण्यात आला आहे. कोव्हीड 19 च्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर बेरोजगारीच्या पार्श्‍वभूमीवर महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण फायदेखील ठरणार आहे. महापालिकेने त्यासाठी 1.81 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. 

ऑनलाईन महासभेवर महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव

महिला व बालकल्याण विभागाला महापालिकेच्या एकुण अंदाजपत्रकापैकी पाच टक्के निधी राखिव ठेवला जातो. परंतू गेल्या काही वर्षात हा निधी बांधकाम किंवा अन्य विभागांकडे वळविण्याची प्रथा पडली होती. परंतू महिलांना आवाज उठविल्यानंतर या प्रथेला ब्रेक लागला आहे. महिला व बालकांचा निधी त्याच कामासाठी खर्च झाला पाहिजे अशी सदस्यांची मागणी आहे. त्यानुसार ऑनलाईन महासभेवर महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रशासाने 1100 महिलांना प्रशिक्षण देण्याची तरतूद

तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महिला सबलीकरणासाठी योजना गरजेचे असल्याची भुमिका घेत महिला व बालकल्याण समितीची मागणी मान्य केली. महिला व बालकल्याण समितीने दहा हजार महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतू प्रशासाने 1100 महिलांना प्रशिक्षण देण्याची तरतूद केली आहे. लाभार्थींना शासन निर्देशानुसार नोंदणीकृत संस्थे मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींची बायोमेट्रीक हजेरी नोंदविणे बंधनकारक केले जाणार आहे. 

महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी कार्यक्रम 
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या यादी मध्ये ब्युटी थेरपी ऍन्ड हेअर स्टाईल, इन्टीग्रेटेड कोर्स इन हेअर स्किन ऍन्ड मेकअप, माहिती व तंत्रज्ञान-डिटीपी, माहिती व तंत्रज्ञान- कॉम्प्युटर नेटवर्क असिस्टंट, टेलरिंग, पर्सनल सुरक्षा रक्षक, औद्योगिक सुरक्षा रक्षक, ईव्हेंट सुरक्षा रक्षक, बेड साईड असिस्टंट, व्हॅक्‍सिनेशन टेक्‍नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, डेंटल सिरॅमिक असिस्टंट, फार्मसी असिस्टंट, बॅंकींग ऍन्ड अकाऊंटींग, फॅशन डिझायनिंग- असिस्टंट फॅशन सेल्स व शोरूम एक्‍झिक्‍युटीव, हाऊस किपर, हॉस्पीटॅलिटी असिस्टंट, हाऊस होल्ड सर्व्हिसेस जनरल, फ्रंट ऑफिस कम रिसेप्शनिस्ट याचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT