NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: भविष्यनिर्वाह निधी भरण्यास महापालिकेचा विलंब; पीएफ कार्यालयाकडून तंबी

सकाळ वृत्तसेवा

NMC News: महापालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांसह मानधन, कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचायांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम या कार्यालयाकडे भरणे बंधनकारक आहे. परंतु असे असतानाही महापालिका या सरकारी संस्थेकडून विलंब लावला जात आहे.

त्यामुळे आता भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाकडूनच महापालिकेला तंबी देण्यात आली. पीएफ कार्यालयाच्या भूमिकेमुळे महापालिकेने नियमित कर्मचाऱ्यांसह मानधनावरील कर्मचाऱ्यांचे पीएफ रक्कम मुदतीत भरण्याच्या सूचना दिल्या. (Municipal Corporation delay in payment of provident fund nashik news)

महापालिका प्रशासनाला रिक्त पदे भरण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे बहुतांश सेवांचे खासगीकरण होत आहे. खासगीकरणात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरणे बंधनकारक आहे. कर्मचारी भविष्य निधी कायद्यानुसार या कर्मचाऱ्याच्या भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी रक्कम त्यांच्या मानधनातून कपात केली जाते, तर महापालिकेला ठराविक हिस्सा अंशदान रकमेसह दरमहा १५ तारखेच्या आत कर्मचारी भविष्य निधी संगठन विभागाकडे ऑनलाइन जमा करावा लागतो.

परंतु या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके लेखा विभागात वेळेत प्राप्त होत नसल्याने मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी व महापालिकेचा हिस्सा अंशदान रकमेचा भरणा कर्मचारी भविष्य निधी संगठन विभागाकडे ऑनलाइन विहित मुदतीत देता येत नाही.

मुदतीत भरणा न झाल्याने रकमेवर दंड व व्याजाची आकारणी का करू नये, अशा आशयाची नोटीस कर्मचारी भविष्य निधी संगठन विभागाने महापालिकेला बजावली आहे.

त्यामुळे समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांनी ज्या विभागांमध्ये मानधनावर, कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन अदा करण्याची देयके, दरमहा ५ तारखेच्या आत तयार करावी व वेतन अदायगी व भविष्य निधीची रकमेचा भरणा करण्याकरिता लेखा विभागाकडे जमा करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

ज्या विभागातील मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे देयक उशिरा प्राप्त झाल्यास त्यामुळे मनपाला भविष्य निधी कार्यालयाकडून दंड व व्याज आकारणी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT