Nashik Municipal Corporation Election
Nashik Municipal Corporation Election  sakal
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुक | गुंतागुंतीच्या प्रभागात इच्छुकांच्या गर्दीने रंगत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या नव्या रचनेत प्रभाग २४ सर्वाधीक तुटफूट होऊन त्यातील विविध तुकडे जोडून तयार झालेला प्रभाग आहे. प्रचलित सुमारे सहा प्रभागातील थोडा थोडा भाग एकत्र होऊन नवा प्रभाग झाला आहे. सहाजिकच शहरातील सर्वाधीक इच्छुकांचा प्रभाग म्हणूनही कदाचित हाच प्रभाग असण्याची शक्यता आहे.

नाशिक रोड विभागातील अनेक वैशिष्ट्यांचा प्रभाग म्हणून चोवीसचा उल्लेख होईल. हार्ट ऑफ नाशिक रोड अशा प्रभागाची रचना आहे. विद्यमान साधारण सहा प्रभागांचे तुकडे करून हा नवीन प्रभाग झालेला असल्याने सगळ्याच भागातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, सुमारे पावणेआठ हजारावर आंबेडकरी अनुयायांचे एकगठ्ठा मतदान असल्याने राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघात भविष्यात स्पर्धक रहायला नको. जणू काही असे गणित मांडूनच प्रभागाची रचना करताना फिक्सिंग झाले की काय, अशी शंका यावी इतकी येथे चुरस आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवार पराभूत झाला म्हणजे देवळाली मतदारसंघात इच्छुक स्पर्धेसाठी दावेदारी कमकुवत ठरणार असेही यामागे गणित लावले जाते. त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने येथील निवडणुकीला महत्त्व आहे.

प्रभागाची व्याप्ती

सेंट्रल जेल, कलानगर, विभागीय आयुक्त कार्यालय, नवले चाळ, देवी चौक, बिटको हॉस्पिटल, जवाहर मार्केट, दुर्गा गार्डन, गोसावीवाडी, नारायण बापू नगर, नाशिक रोड रेल्वे स्टेशन.

  • उत्तर - जुना सायखेडा रोडवरील इच्छामणी वस्त्र भांडारपासून इंदिरा गांधी चौकापर्यंत. एमएसईबी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याने जेल रोडपर्यंत, म्हसोबा महाराज मंदिरापासून अंतर्गत रस्त्याने शिवाजीनगर गार्डनच्या उत्तरेकडील हद्द, पुढे खुल्या जागेतील घरांच्या पाठीमागील बाजूने पतंग किराणा स्टोअरपर्यंत, कॅनॉल रस्ता व अंतर्गत रस्त्याने काळाबाई देवी मंदिर लगतच्या रेल्वे लाइनपर्यंत.

  • पूर्व - काळाबाई देवी मंदिर लगतच्या रेल्वे लाइनपासून दक्षिणेकडे रेल्वे लाईनने क्रॉसिंग पुलापर्यंत, पुढे अंतर्गत रस्त्याने पूर्वेकडे दत्तमंदिरापर्यंत, दक्षिणेकडे सिन्नर फाटा पोलिस चौकीअंतर्गत रस्त्याने रेल्वे लाईनपर्यंत.

  • दक्षिण - रेल्वे लाइनपासून अंतर्गत रस्त्याने सुभाष रोडपर्यंत पुढे सुभाष रोडने लॅम रोडपर्यंत.

  • पश्चिम - लॅम रोड, सुभाष रोड चौकापासून उत्तरेकडे बिटको चौकापर्यंत, जेल रोडने इंगळेनगर चौकापर्यंत, पश्चिमेकडे कॅनॉल रोडने जीवनज्योती हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत, उत्तरेकडे पर्ल रेसिडेन्सी रस्त्याने जुन्या सायखडा रस्त्यापर्यंत.

हे आहेत इच्छुक

डॉ. सीमा ताजणे, निवृत्ती अरिंगळे, ॲड. मुकुंद आढाव, संतोष क्षीरसागर, नितीन चिडे, रतन बोराडे, उमेश शिंदे, जयश्री गायकवाड, राजेंद्र ताजणे, मसूद जिलानी, नियमत शेख, राजेंद्र मोरे, संजय गायकवाड, अरुण चव्हाण, योगेश नागरे, बाळासाहेब शेलार, विक्रम पोरजे, संतोष पिल्ले, प्रवीण पवार, पंकज गाडगीळ, श्याम दासवाणी, नंदू थेटे, तेजस शेरताटे, दिलीप दासवाणी, हमीद खान, समर्थ मुठाळ, रमेश आहेर, सागर निकाळे, विशाल पवार, दिनेश आहिरे, शिवा गाडे, नीलेश जाधव, सुनील कांबळे, अमोल पगारे, वाल्मीक बागूल, परवीन नियमत, रमेश आहेर, युवराज जाधव, दीपाली घंटे, डॉ. नाठे, राणी मोरे, भावना नारद, सुनील चव्हाण, दुर्गा चिडे, सौ. मुठाळ, शशिकांत चौधरी.

क्रमांक दोनचे सर्वाधिक इच्छुक

निवडणूक म्हटली म्हणजे, निवडणूक रिंगणात हौसे-नवसे उतरतात हे खरेच पण येथील इच्छुकांची नावे पाहिली तर किमान दीड डझनभर इच्छुक असे आहेत की, ज्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहे. त्यामुळे त्यांचे प्रभागातील इच्छुकांचे राजकारणातील महत्त्व कमी लेखता येणार नाही. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे शहरातील प्रत्‍येक प्रभागात विद्यमान नगरसेवकांमध्ये चुरस आहे. पण या प्रभागात मात्र भाजपच्या सीमा ताजणे यांचा एकमेव अपवाद सोडला तर एकही विद्यमान या प्रभागात इच्छुक नाही. त्यामुळे एकही नगरसेवक इच्छुक नसलेल्या व्यापारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती असलेल्या निवृत्ती अरिंगळे, जयश्री गायकवाड, रतन बोराडे असे अवघ्या तीन माजी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे. अशा आजी-माजी नगरसेवकांनी पाठ फिरविलेला म्हणूनही हा प्रभाग आगळावेगळा ठरावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT