omicron variant  Sakal
नाशिक

नाशिकमध्ये परदेशातून 22 नागरिकांचे आगमन; महापालिका हाय अलर्टवर

विक्रांत मते

नाशिक : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या भयानक तिसऱ्या आवृत्तीमुळे (Omicron Variant) संपूर्ण जग हादरले असून भारतातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. युरोपियन देशांमध्ये लॉकडाउन होत असताना भारतात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याची बाब समोर आली आहे. रविवारपासून परदेशातून आलेल्या नागरिकांची आकडेमोड संकलित केली जात असताना मंगळवारी (ता. ३०) शहरात तब्बल २२ परदेशी पाहुणे आल्याचे समोर आले आहे.

गंगापूर रोड, सिडको आदी भागात वास्तव्याला असून, त्यांची स्वॅब तपासणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. या विषाणूचे ३० म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे जगभरात ओमिक्रॉनबाबत सतर्कता बाळगली जात आहे. नाशिकबाबत विचार करायचे झाल्यास परदेशातून येत असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत आयर्नमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या दोन व त्यांच्या कुटुंबासह वाहनचालक, असे पाच जण परतले. त्यामुळे शहरात ओमिक्रॉनची दहशत निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. परदेशातून आलेल्या नागरिकांवर प्रशासनाची बारीक नजर असून, अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. काही थेट भारतात न येता दुबईमार्गे येत आहे. फ्रान्सवरून एक नागरिक दुबईमार्गे भारतात व पुढे नाशिकमध्ये आला. ओमिक्रॉनमुळे जिल्हाधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाला सूचना दिल्यानंतर त्या व्यक्तीचा शोध घेऊन स्वॅब घेण्यात आले. त्या व्यक्तीचा रिपोर्टदेखील निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

शहरात वाढली धाकधूक

लंडन येथून तीन, नेदरलॅण्डमधून पाच, अमेरिकेतून एक, शारजा येथून एक दुबईतून नऊ, तर दोहा येथून तीन असे एकूण बावीस नागरिक शहरात दाखल झाले आहेत. गंगापूर रोड, इंदिरानगर, सिडको व शरणपूर रोड येथे परदेशातून आलेले नागरिक वास्तव्याला आहेत. या नागरिकांवर वैद्यकीय विभागाकडून नजर ठेवण्यात आली आहे. परदेशातून नाशिकमध्ये नागरिक आले असले तरी त्यातील काही नागरिकांच्या निवासाचा पत्ता चंडीगड येथील असल्याने लग्नसमारंभासाठी आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT