नाशिक

अस्वच्छता, वाघुरच्या पाण्याच्या मुद्दावर महासभेत होणार चर्चा

CD
(महापालिका इमारतीचा फोटो वापरावा) अस्वच्छता, ‘वाघूर’च्या पाण्याच्या मुद्दावर आज गाजणार महासभा मनपात ३०० कोटींच्या कामांना मिळणार मंजुरी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करून स्वनिधी बळकट करण्यासोबतच शहरातील विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने शुक्रवारी (ता. ९) ऑक्टोबरला होणारी महासभा महत्त्वाची ठरणार आहे. सप्टेंबरमध्ये होऊ न शकलेली महासभेत २८ विषयांवर होणार असून, तब्बल ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवले जाणार आहे. तसेच शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा व वाघूर जलवाहिनीवरून मेडिकल हब व विभागीय क्रीडा संकुल यांना पाणीपुरवठाच्या जोडणी देण्याच्या प्रस्तावार महत्वपूर्ण चर्चा व निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी बाराला महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे. सभेच्या विषयपत्रीकेवर २८ विषय असून त्यावर चर्चा व निर्णय घेतले जाणार आहे. यात शहरात वाढत असलेल्या क्रिकेट टर्फ, मल्टी-स्पोर्ट्स टर्फ, रूफटॉप रेस्टॉरंट, कॅफे आणि व्यावसायिक वापराच्या टेरेस जागांना स्वतंत्र वर्गीकरण करून मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्याचा प्रस्तावही मांडला जाणार आहे. याशिवाय मोहाडी रोड ते शिरसोली रोड या महत्त्वाच्या मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रस्तावही अजेंड्यावर आहे. महापालिका मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरण धोरणानुसार भाडे व सुरक्षा ठेव पुनर्निर्धारित करण्याचा विषयही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. चौकट ३०० कोटींचे प्रस्ताव गेल्या आठ महिन्यांत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विविध विकासकामांसाठी महापौरांकडे प्रस्ताव सादर केले होते. हे प्रस्ताव आता महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. भाजप नगरसेवकांचे १६५ कोटी २१ लाख रुपये, शिवसेना नगरसेवकांचे १२२ कोटी ६९ लाख रुपये, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांचे ६९ लाख रुपयांचे प्रस्ताव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

SCROLL FOR NEXT