नाशिक महापालिका sakal
नाशिक

नाशिक : महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

प्रभाग रचनेवरून उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल

विक्रांत मते

नाशिक : राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू केल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून, याचिकांचा निकाल राज्य शासनाच्या विरोधात लागल्यास निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या प्रारंभी होत आहेत. या निवडणुकांसाठी राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत लागू करण्याचा कायदा विधानसभेत संमत केला होता. त्यानुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिल्या होत्या. परंतु, द्विसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करावी अशी मागणी होती. मात्र, राज्य शासनाने द्विसदस्यीय ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग निवडणुकीसाठी घोषीत केला.

त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग पद्धतीसाठी तीन सदस्यांचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याची तयारी महापालिकेने केली असतानाच प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. पुणे येथील परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर व पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे काम पाहात आहेत.

माजी नगरसेवक भापकर यांच्या याचिकेत ॲड. सरोदे यांनी ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार विभाग सभा घेण्याचे नियम आधी तयार करावे, तोपर्यंत बहु सदस्य प्रभाग पद्धतीला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. न्यायमूर्ती ए. ए. सय्यद व न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (ता. १६) सुनावणी झाली. त्यात याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोग व राज्य शासनाला म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली. दरम्यान, उच्च न्यायालयाने वादी व प्रतिवादी दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्य शासनाच्या विरोधात निकाल दिल्यास महापालिका निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेर

SCROLL FOR NEXT