नाशिक : कोरोनाच्या रुग्णांना कधी बेड मिळत नाही, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण, रुग्णाच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी धडपड यामुळे वारंवार वाद निर्माण होतात. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना कर्मचाऱ्यांमध्येदेखील भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईक व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचेही समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच
आयुक्त गमे : डॉ. हुसेन रुग्णालयात पाहणी
कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाला गुरुवारी (ता. ६) आयुक्त गमे यांनी भेट दिली.
महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची दक्षता घेत असताना कर्मचाऱ्यांनीदेखील स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करताना त्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना बसण्यासाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी चौकी उभारणे, पार्किंगमध्ये स्वच्छता करणे, रुग्णालयातील दूरध्वनीची संख्या वाढवावी, रुग्णालयातील सर्व कक्षांमध्ये आवश्यक माहिती पोचण्यासाठी साउंड सिस्टिमचे नियोजन, रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. राहुल पाटील, डॉ. नितीन रावते, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, कोरोनाकक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, संध्या सावंत, स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.
रिपोर्ट - विक्रांत मते
संपादन - रोहित कणसे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.