manmad esakal
नाशिक

मनमाड : तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : इंस्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट करण्याच्या वादातून २१ वर्षीय तरुणांची चाकूने भोसकून ४ ते ५ तरुणांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकावर घडली. शिवम पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो चांदवड तालुक्यातील उसवड येथिल रहिवाशी आहे कल्याण येथील मुलीसोबतच्या प्रेम संबंधातून हत्या झाल्याचे समोर येत आहे.

अगोदर चोऱ्या, मारामाऱ्या, अवैद्य धंदे आदींमुळे चर्चेत असलेले मनमाडचे रेल्वे जंक्शन स्थानकावर आता खुणामुळे चर्चेत येऊ लागले आहे. इंस्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट करण्याच्या वादातून २१ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकावर रात्री २ च्या सुमारास  घडली. शिवम पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील उसवाड येथील रहिवाशी आहे. शिवमचे कल्याण येथे राहणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधातून त्याने इंस्टाग्राम अकाउंट खोलले होते हे अकाउंट बंद करण्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते. वाद मिटविण्यासाठी तरुणीचे त्याला मनमाड रेल्वे स्थानकावर भेटण्याचे ठरले होते. मात्र येतांना ही तरुणी एकटी आली नाही तर तिच्या सोबत चार ते पाच तरुण आले. रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ व ४ मधील गार्डन जवळ मुलीसोबत आलेल्या या ४ ते ५ तरुणांनी शुभमला बेदम मारहाण करीत चाकूने सपासप वार केले चाकूने भोकसल्याने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून, संशयित मारेकरी मात्र फरार झाले आहेत संशयित कल्याण ,उल्हासनगर भागातील आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र चार ते पाच जणांच्या टोळक्याने स्टेशनवरील फलाटावर चाकूने भोसकून हत्या करत असताना स्थानकावर गस्त घालणारे आरपीएफ काय करत होते असा सवाल उपस्थित केला जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT