Inn Criminal esakal
नाशिक

Nashik : सिडकोत सराईत गुन्हेगाराचा खून; दोघांना अटक

नरेश हळनोर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोतील महालक्ष्मी नगर येथे सराईत गुन्हेगाराचा डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. सदरची घटना शुक्रवारी(ता.28) रात्री घडली. याप्रकरणी तन्मय गोसावी व आकाश साळुंखे या दोघांना अंबड पोलिसांनी अटक केली. आकाश जाधव असे मयत झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे शुक्रवारी (ता. 28) रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास संशयित तन्मय गोसावी, आकाश साळुंखे हे बसलेले असताना त्या ठिकाणी अक्षय जाधव हा काही साथीदारांसह आला.(Murder of inn criminal in Cidco Both arrested Nashik Crime News)

त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर तन्मय गोसावी याने त्याच्याकडील कोयत्याने अक्षय जाधवच्या डोक्यात वार केला. त्यानंतर तो पळू लागला असता संशयित तन्मय आणि आकाश यांनी त्याचा पाठलाग करून त्यास मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला. घटनेची माहिती कळतच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गंभीर जखमी अक्षय जाधव याला पोलीस गाडीतूनच जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान प्रसार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलिसांनी अक्षय जाधव यांचे मारेकरी संशयित तन्मय गोसावी व आकाश साळुंखे या दोघांना अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपयुक्त विजय खरात व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अक्षय सराईत गुन्हेगार

अंबड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय जाधव हा वीस दिवसांपूर्वीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जमिनावर बाहेर आला होता. गेल्या वर्षी त्यास शहर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आलेले होते. खून प्राणघातक हल्ले, घरफोड्या, हाणामाऱ्या, लुटमार यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, तुमच्या शहरात काय आहे ताजा भाव? जाणून घ्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

Explained : बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातील सामने खेळण्यास नकारच दिला तर काय? त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल?

धक्कादायक! धनसंपत्तीच्या हव्यासापोटी चक्क नरबळीचा प्रयत्न; 8 महिन्यांच्या बाळाची थरारक सुटका, सय्यद इम्राननं असं का केलं?

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

SCROLL FOR NEXT