Murder of Nanasaheb Kapdanis and his son Amit for property in Nashik city crime News  esakal
नाशिक

नाशिक : दुहेरी हत्याकांड - पोलिस आणखी तिघांच्या मागावर

विनोद बेदरकर


नाशिक
: मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचे पूत्र डॉ. अमित यांच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार राहुल जगताप याला दोन हत्या आणि मृतदेहासह पुरावे नष्ट करण्यास मदत करण्याचा संशय असलेल्या तिघांच्या मागावर पोलिस आहेत. हे तिघे परराज्यात पळून गेल्याच्या संशयावरून पोलिसांनी पथके रवाना केल्याचे समजते. दरम्यान, शेजारील राज्यात एकाचे लोकेशन मिळाले. मात्र, पोलिस तेथे पोचण्यापूर्वी संशयितांपैकी एकाने ठिकाण बदलल्याची चर्चा आहे.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल जगताप हा सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिक रोडला मध्यवर्ती कारागृहात आहे. पण, त्याला या संपूर्ण प्रकरणात विविध प्रकारे मदत करण्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्या तिघांपैकी एकाचा भाऊ गंभीर गुन्ह्यात कारागृहात असल्याने पोलिसांनी संशयिताला मदत करणाऱ्या त्याच्या तिघा मित्रांचा तपास सुरू केला आहे. या तिघांची नावेही पुढे आली आहेत. मात्र, ते फरारी असल्याने पोलिस नावाबाबत गोपनीयता बाळगून आहेत. या तिघांच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांनी परराज्यांत तीन पथके पाठविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT