murder esakal
नाशिक

लग्न करण्यास गळी पडत असल्याने मेहुणीचा खून

पहिल्या दोन बायकांच्या दादल्याने तिसरीला आपल्या जाळ्यात ओढले.

सकाळ वृत्तसेवा

घोटी/इगतपुरी शहर : पहिल्या दोन बायकांच्या दादल्याने तिसरीला आपल्या जाळ्यात ओढले. यातील सख्या मेहुणीने लग्नाचा तगादा लावला. लग्नास नकार देत असल्याने रागातून मी तुझे घर पेटवून देईल, अशी धमकी देत एका घराला आग लावली. याचा राग अनावर झाल्याने लग्नाचा तगादा लावणाऱ्या त्या मेहुणीचा दाजीने खून केला. विशेष म्हणजे, या घटनेत फिर्यादीच मुख्य संशयित आरोपी असल्याचे समोर आले. ही घटना घडली ती इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथे कातकरी कुटुंबात शनिवारी (ता. ११) पहाटे साडेचारच्या दरम्यान.
लक्ष्मी संजय पवार (वय २४, रा. बिरुळे, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी : अधरवड ताराची वाडी (ता. इगतपुरी) येथे वाघ कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून राहात आहेत. यातील शरद वाघ हा आपल्या दोन पत्नींसमवेत राहातो. याच दरम्यान पाहुणी म्हणून आलेली शरदची मेहुणी लक्ष्मी पवार हीदेखील ऊसतोडणीसाठी त्यांच्या सोबतच राहात होती. लक्ष्मीचे शरद (दाजी) सोबतच काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधातून लक्ष्मीने शरदकडे माझ्याशी लग्न करा म्हणून तगादा लावला. परंतु आधीच दोन पत्नी, त्यांना असलेली मुले यांच्या संगोपनाची जबाबदारी असतानाच पुन्हा तिसरी पत्नी नको म्हणून शरदने नकार दिला. ‘तू लग्न करत नाही, तर मी तुझे घर जाळील’, अशी धमकी देत झोपडीवजा खोपी लक्ष्मीने शनिवारी पहाटे पेटून दिली. या आगीत शेजारची अन्य दोन-तीन घरे(खोपी) जळून खाक झाली. घर जाळल्याच्या रागातून शरदने घरातील कोयत्याने लक्ष्मी हिच्या मानेवर प्रहार केला. यात ती जागीच गतप्राण झाली.

...अन्‌ झाला खुनाचा उलगडा

सुरवातीला मुख्य आरोपी शरद याने बाहेरच्या अज्ञात व्यक्तीने घर जाळून खून केल्याची फिर्याद पोलिसांना दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक भोसले यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब राऊत, शिवाजी जुंदरे, हवालदार सुहास गोसावी, शीतल गायकवाड, केशव बसते, किसन कचरे, संदीप मथुरे, पंकज दराडे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेत पंचनामा केला. संशयित आरोपी याच्या वरचा खिशात सुट्टे पैसे होते. घराला आग लागली असताना खिशातील पैसे कसे सावरले असेन, याचा तपासी पथकाला संशय गेला. संशयिताला पोलिसी खाक्या दाखविताच त्याची तोतरी उडाली अन्‌ खुनाचा घटनाक्रम त्याने कथन करीत रक्ताने माखलेले कपडे आगीत फेकून पोबारा केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT